सातारा 

​कोरोना रुग्णांवर उपचार करणार्‍या बोगस महिला डाॅक्टरला अटक

कराड ​(अभयकुमार देशमुख)​ :
कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना बोगस डाॅक्टरांच्या घटनाही घडत आहेत. सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील नारायणवाडी येथे एका महिला बोगस डाॅक्टरला पोलिसांनी कोरोना रुग्णांवर उपचार करताना रंगेहाथ पकडले आहे. कराड पोलिसांनी सदर बोगस महिला डाॅक्टरला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरु आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, कराड तालुक्यातील नारायणवाडी येथे एक महिला डाॅक्टर पंत क्लिनिक नावाने एक क्लिनिक चालवत होती. कोरोना रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तसेच कोरोना मृत्यूदरही वाढत आहे. यापैकी अनेक रुग्णांनी पंत क्लिनिक येथे उपचार घेतल्याची माहिती काले प्राथमिक आरोग्य केद्रातील वैद्यकीय अधिकारी यादव यांना मिळाली.

त्यानंतर त्यांनी सदर क्लिनिकला भेट दिली. मात्र अनेकदा हे क्लिनिक बंद असल्याने यादव यांना शंका आली. त्यानंतर त्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. आज बुधवारी दुपारी ३ च्या सुमारास पंत क्लिनिक येथे एक महिला डाॅक्टर रुग्णांवर उपचार करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यानंतर सापळा रचून पोलिसांनी पंत क्लिनिकवर छापा मारला असता सदर महिला डाॅक्टर बोगस असल्याचे उघड झाले

सदर पंत क्लिनिक हे डॉ. पी. के. पवार यांच्या नावावर नोंद असल्याची माहिती डाॅ. बी. आर. यादव वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र काले यांनी दिली. तसेच सदर बोगस महिला डाॅक्टरचे नाव सुवर्णा मोहिते असून त्या रेठरे बुद्रुक येथील रहिवासी असल्याची माहिती मिळाली आहे. मागील दोन वर्षांपासून हा दवाखाना सुरु असल्याचे स्थानिकांनी सांगितले आहे. यावेळी पोलीस ​​उपनिरिक्षक अशोक भापकर यांच्यासह पोलीस कर्मचारी उपस्थित होते.​

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: