क्रीडा-अर्थमत

कॅनरा बँकेच्या कार्यकारी संचालकपदी ब्रिजमोहन शर्मा

बंगळुरू :
ब्रिजमोहन शर्मा यांची कॅनरा बँकेचे नवीन कार्यकारी संचालक पदी नेमणूक करण्यात आली आहे. शर्मा यांनी ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्समध्ये १९८३ पासून काम करायला सुरुवात केली, त्यानंतर ते प्रगती करत पंजाब नॅशनल बँकेत चीफ जनरल मॅनेजर पदापर्यंत पोहोचले.

आपल्या बँकिंग क्षेत्रातील ३७ वर्षांच्या कारकीर्दीत त्यांनी विविध पदांवर काम केले आहे. त्यांनी पुणे आणि भोपाळ विभागाचे स्थानीव प्रमुख म्हणूनही काम पाहिले आहे. तसेच त्यांनी क्लस्टर मॉनिटरिंग हेड, ब्रँच बिझनेस, वेस्टर्न इंडिया आणि इन्स्पेक्शन व कंट्रोल विभागाचे व्हर्टिकल हेड म्हणूनही काम पाहिले आहे. त्यांच्याकडे ब्रँच बँकिंग, कॉर्पोरेट क्रेडिट, रिटेल क्रेडिट, इन्स्पेक्शन आणि ऑडिट विभाग इत्यादी विभागांसह बँकिंग क्षेत्रातील विविध घटकांचा अनुभव आहे. त्यांनी नुकताच कॅनरा बँकेच्या कार्यकारी संचालक म्हणून पदभार स्वीकारला आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: