देश-विदेश

‘हा’ देश कोरोनमुक्तीच्या उंबरठयावर… 

नवी दिल्ली :
भारतामध्ये सुरु असलेला कोरोना कहर आटोक्यात येणे कठीण होत असल्याचे चित्र सर्वत्र आहे. अशावेळी गेल्या महिन्यात इस्त्रायलने स्वतःला कोरोनामुक्त देश म्ह्णून घोषित केले. त्यानंतर आता “येत्या ऑगस्ट महिन्यापर्यंत ब्रिटन करोनामुक्त झाला असेल”, असा दावा ब्रिटनच्या लसीकरण टास्क फोर्सचे मावळते अध्यक्ष क्लाइव्ह डिक्स यांनी केला आहे. टेलिग्राफच्या बातमीनुसार, “ऑगस्ट महिन्यापर्यंत युकेमध्ये करोनाचा प्रसार थांबलेला असेल”, असं देखील त्यांनी सांगितलं. ब्रिटनमध्ये फायझर आणि मॉडेर्नासोबतच काही प्रमाणात ऑक्स्फोर्डने विकसित केलेल्या कोविशिल्ड लसीचे डोस दिले जात आहेत. या पार्श्वभूमीवर ब्रिटनकडून करण्यात आलेला हा दावा समस्त जगासाठीच एक दिलासादायक बाब म्हणावी लागेल.

जगभरात करोनाचा होत असलेला प्रसार अद्याप आटोक्यात आलेला नसताना ब्रिटनने अशा प्रकारे दावा करणं ही महत्त्वाची बाब ठरली आहे. क्लाइव्ह डिक्स यांनी सांगितल्यानुसार, युकेमध्ये आत्तापर्यंत ५ कोटी १० लाख नागरिकांना लसीकरण पूर्ण झालं आहे. ऑगस्ट महिन्यापर्यंत युकेमधल्या प्रत्येकाला करोना लसीचा किमान एक डोस तरी दिला गेलेला असेल. त्यामुळे तोपर्यंत ब्रिटनने आपल्या सर्व लोकांना सध्या माहिती असलेल्या करोनाच्या सर्व प्रकारांपासून संरक्षित केलेलं असेल. देशातल्या तरुण लोकसंख्येपैकी किमान अर्ध्या लोकसंख्येला लसीकरण करून ब्रिटन या गटासाठी सर्वात वेगाने लसीकरण करणारा दुसरा देश ठरला आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: