महाराष्ट्रसातारा 

‘कर्करुग्णांनी कोरोना लसीकरणाला घाबरु नये’

सातारा (महेश पवार) :
कर्करोगावर (cancer) सुरु असलेले उपचार तसेच औषधांमुळे रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्याने कर्करुग्णांना कोविड १९ संसर्गाचा धोका अधिक असतो. कोणत्याही लशीचा मुख्य उद्देश शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी मदत करणे हा असतो. त्यामुळे कॅन्सरग्रस्तांसाठी लस उपयुक्त ठरू शकते. मात्र, रुग्णांची रोगप्रतिकारशक्ती बळकट करण्यासाठी ही लस वैद्यकीय सल्ल्याने घ्यावी.  केमोथेरपी व रेडिएशन थेरपी सुरू असणाऱ्या रुग्णांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच लसीकरण करणे गरजेचे आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या कॅन्सरच्या प्रकारानुसार लसीकरणासंदर्भात हा निर्णय घेण्यात येईल अशी प्रतिक्रिया साता-यातील ऑन्कोलाईफ कॅन्सर सेंटरचे कर्करोगतज्ञ डॉ दत्तात्रय आंदुरे यांनी व्यक्त केली.

साता-यातील ऑन्कोलाईफ कॅन्सर सेंटरच्या स्त्री कर्करोग (cancer)तज्ञ डॉ तेजल गोरासिया सांगतात कॅन्सर रुग्णांमध्ये रोगप्रतिकारशक्ती खूपच कमी असल्याने या रुग्णांमध्ये विषाणुचा संसर्ग होण्याचा धोका अधिक असतो. मात्र, लसीकरणामुळे या रुग्णांना या धोक्यापासून दूर ठेवता येऊ शकते. कोविड-१९ लस ही कॅन्सर रुग्णांसाठी नक्कीच फायदेशीर ठरू शकते. सध्या उपचारासाठी येणाऱ्या सर्व कॅन्सररुग्णांची कोविड चाचणी केली जात आहे. केमोथेरपी, इम्युनोथेरपी सुरु असलेल्या रुग्णांमध्ये लसीचा प्रभाव कमी होऊ शकतो. कारण कमकुवत रोगप्रतिकार शक्ती असलेल्या कर्करुग्णांना लसीकरणानंतर गंभीर दुष्परिणामही उद्भवू शकतात. लसीकरणानंतर देखील मास्कचा वापर करणे, सामाजित अंतर राखणे, हात स्वच्छ धुणे या त्रिसूत्रींचे पालन करावे लागणार असल्याचे रुग्णांनी लक्षात घेणे आवश्यक आहे.

डॉ गोरासिया पुढे सांगतात कर्करोगावर उपचार सुरु असणा-या रुग्णांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. स्वतःच्या मर्जीने औषधोपचार करू नका. वेळोवेळी तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. कोणत्याही दुष्परिणामांना घाबरुन जाऊ नका. ल्युकेमेनिया सारखी थेरपी घेत असलेल्या रुग्णांचे कोरोना लसीकरण थोडे उशिरा झाल्यास हरकत नाही. यासंबंधी डॉक्टरांशी बोलणे अत्यंत गरजेचे आहे. किमोथेरपी किंवा रेडीएशन सारखे उपचार घेत असलेल्या रुग्णांनी त्याच्या शेवटच्या थेरपीनंतर ५ ते ७ दिवसांचे अंतर ठेवून लस घेतली पाहिजे असे तज्ज्ञ सांगतात. त्याचबरोबर लसीकरण करण्याआधी रक्ताची सीबीसी टेस्ट करणेही आवश्यक आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: