क्रीडा-अर्थमत

उद्या सुरु होणार ‘कारट्रेड’चा आयपीओ

मुंबई :
कारट्रेड टेक हा कारवाले, कारट्रेड, श्रीराम ऑटोमॉल, बाइकवाले, कारट्रेड एक्स्चेंज, अॅड्रॉइट ऑटो आणि ऑटो बिझ या अनेक इंटिग्रेटेड ब्रँड्सचा मल्टि-चॅनल ऑटो प्लॅटफॉर्म आहे. या कंपनीतर्फे 9 ऑगस्ट 2021 रोजी इनिशिअल पब्लिक ऑफरिंग खुले करण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे आणि हे ऑफरिंग 11 ऑगस्ट 2021 रोजी बंद होईल. या ऑफरसाठी प्रति इक्विटी शेअर रु.1,585 – रु.1,618 इतका प्राइस बँड निर्धारित करण्यात आला आहे.

ही ऑफर सीएमडीबी II, हायडेल इन्व्हेस्टमेंट लि., मॅक्रिची इन्व्हेस्टमेंट पीटीई. लि., स्प्रिंगफील्ड व्हेंचर इंटरनॅशनल, बिना विनोद सांघी (विनय विनोद सांघी यांच्यासह संयुक्तपणे असलेले), डॅनिअल एडवर्ड निअरी, श्री कृष्ण ट्रस्ट, व्हिक्टर अँथनी पेरी III, विनय विनोद सांघी (सीना विनय सांघी यांच्यासह संयुक्त असलेले) या सेलिंग शेअरहोल्डर्सकडून 18,532,216 पर्यंत इक्विटी शेअर्सच्या विक्रीची ऑफर आहे. या ऑफरमधून गोळा होणारा निधी कंपनीला मिळणार नाही.

कंपनी आणि प्रमुख सेलिंग शेअरहोल्डरर्स आणि गुंतवणूकदार सेलिंग शेअरहोल्डर्सनी ऑफरच्या बुक रनिंग लीड मॅनेजर्सशी सल्लामसलत करून अँकर इन्व्हेस्टर्सचा सहभाग मान्य केला आहे, ज्याचा सहभाग बोली / ऑफर खुली होण्याच्या तारखेच्या एक कार्यालयीन दिवस आधी म्हणजे शुक्रवार, दिनांक 06 ऑगस्ट 2021 रोजी असेल.

ही ऑफर सेबी आयसीडीआर रेग्युलेशन्सच्या रेग्युलेशन 31 सह सिक्युरिटीज कॉन्ट्रॅक्ट्स (रेग्युलेशन्स) नियम, 1957 नियम 19(2)(b) नुसार देण्यात आली आहे. ही ऑफर सेबी आयसीडीआर रेग्युलेशन्सच्या रेग्युलेशन 6(1) नुसार करण्यात आली आहे. ही ऑफ बुक बिल्डिंग प्रक्रियेच्या माध्यमातून करण्यात आली असून यात 50% हून अधिक निव्वळ ऑफर क्वालिफाइड इन्स्टिट्युशनल खरेदीदारांना वाटपासाठी उपलब्ध नसेल आणि नॉन इन्स्टिट्युशनल खरेदीदारांना वाटप करण्यासाठी 15% हून कमी निव्वळ ऑफर उपलब्ध नसेल आणि रिटेल वैयक्तिक बिडर्सना वाटप करण्यासाठी 35% हून कमी निव्वळ ऑफर उपलब्ध नसेल.

कारट्रेड हा मल्टि-चॅनल ऑटो प्लॅटफॉर्म असून सर्व वाहन प्रकार आणि मूल्य-वर्धित सेवांमध्ये त्यांची व्याप्ती आणि अस्तित्व आहे. कंपनीचा प्लॅटफॉर्म अनेक ब्रँड्सअंतर्गत काम करतो : कारवाले, कारट्रेड, श्रीराम ऑटोमॉल, बाइकवाले, कारट्रेड एक्स्चेंज, अॅड्रॉइट ऑटो आणि ऑटोबिझ. या प्लॅटफॉर्म्सच्या माध्यमातून कारट्रेड टेक नव्या आणि वापरलेल्या गाड्यांचे ग्राहक, वाहन डीलरशिप्स, वाहन ओईएम आणि इतर व्यवसायांना त्यांच्या गाड्या सोप्या आणि कार्यक्षम पद्धतीने खरेदी करण्यास व विकण्यास सक्षम करते.

कंपनीच्या कारवाले, कारट्रेड आणि बाइकवाले या कन्झ्युमर प्लॅटफॉर्म्सना सरासरी एकूण 3.2 कोटी युनिक अभ्यागत दर महिन्याला भेट देतात (31 मार्च 2021 रोजी संपलेल्या तीन महिन्यांची आकडेवारी) आणि आर्थिक वर्ष 2021मध्ये श्रीराम ऑटोमॉल आणि इतर लिलाव प्लॅटफॉर्म्सवर लिलावासाठी 8,14,316 वाहने लिस्ट करण्यात आली होती.

आर्थिक वर्ष 2020मध्ये नफा झालेला कारट्रेड हा एकमेव डिजिटल ऑटो प्लॅटफॉर्म होता (स्रोत : रेडसीअर रिपोर्ट). आर्थिक वर्ष 2019 पासून कारट्रेड टेक हा फायद्यात असलेला प्लॅटफॉर्म आहे

लिलाव व रिमार्केटिंग सेवांमधून मिळणारे शुल्क आणि कमिशन, ऑनलाइन जाहिरात सोल्यूशन्स, लीड जनरेशन, ओईएम/डीलर्स/बँका आणि इतर वित्त संस्थांना तंत्रज्ञानाधारीत सेवा आणि परीक्षण व मूल्यनिश्चिती सेवांमधून कंपनीला महसूल मिळतो.

श्री. विनय विनोद सांघी हे कंपनीचे नेतृत्व करत असून ते कंपनीचे अध्यक्ष, व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ आहेत. कंपनीच्या व्यवस्थापनातील प्रमुख व्यक्तींमध्ये कार्यकारी संचालक आणि मुख्य वित्त अधिकारी अनीशा मेनन, कन्झ्युम बिझनेस विभागाचे सीईओ बनवारी लाल शर्मा, श्रीराम ऑटोमॉलचे सीईओ समीर मल्होत्रा, समूहाचे चीफ प्रोडक्ट ऑफिसर आणि समूहाचे चीफ स्ट्रॅटजी ऑफिसर विक्रम अल्वा यांचा समावेश आहे. या कंपनीला वॉरबर्ग पिंकस, टेमासेक, जेपी मॉर्गन अँड मार्च कॅपिटल यांसारख्या प्रख्यात संस्थात्मक शेअरहोल्डर्सचे पाठबळ लाभले आहे.

अॅक्सिस कॅपिटल लिमिटेड, सिटिग्रुप ग्लोबल मार्केट्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, कोटक महिंद्रा कॅपिटल कंपनी लिमिटेड आणि नोमुरा फायनान्शिअल अॅडव्हायजरी अँड सिक्युरिटीज (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड हे या ऑफरसाठी बीआरएलएम आहेत.

येथे वापरण्यात आलेल्या सर्व कॅपिटलाइझ्ड संज्ञा आणि विशिष्ट परिभाषित न केलेल्यांचा अर्थ मुंबई येथील कंपनी निबंधक, महाराष्ट्र (RoC) यांच्याकडे 28 जुलै 2021च्या फाइल करण्यात आलेल्या रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसमध्ये (आरएचपीमध्ये) नमूद केल्याप्रमाणे असेल.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: