सातारा 

‘केंद्राने सर्वसामान्यांचे शोषण थांबवावे’

औंध (अभयकुमार देशमुख) :
केंद्र सरकारने काँग्रेस सरकारच्या काळातील पेट्रोल डिझेल,गॅसच्या किमती दुपटीने वाढविल्या असून लोकांना दिलासा देण्याऐवजी महागाईचे धक्के देण्याचे काम केंद्र सरकार करीत आहे त्यामुळे नागरिकांचे शोषण केंद्र सरकारने थांबवावे अन्यथा मोठे आंदोलन करण्यात येईल असा इशारा काँग्रेस नेते रणजितसिंह देशमुख यांनी दिला.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे  प्रातांध्यक्ष नाना भाऊ पटोले यांच्या सुचनेवरुन केंद्रातील मोदी सरकारच्या पेट्रोल,डिझेल व गॅस दरवाढीविरोधात पेट्रोल पंपावर आंदोलन करण्याच्या सूचना होत्या त्या अनुषंगाने पळशी ता.खटाव येथील पेट्रोलपंपावर तीव्र निषेध करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी बोलताना देशमुख म्हणाले की,मनमोहन सिंग सरकारच्या काळात ५०-६० रुपये पेट्रोल असताना महागाईचा भडका उडाला म्हणणारे भाजपा कार्यकर्ते आता कोणत्या बिळात जाऊन बसले आहेत,सर्वसामान्य लोकांचे जगणेही मुश्कील झाले आहे,दुप्पट वाढ मोदी सरकारने केली असून सातारा जिल्ह्यात मोठे जनआंदोलन उभारणार असल्याचेही रणजितसिंह देशमुख यांनी सांगितले.यावेळी खटाव-माण तालुक्यात पेट्रोल पंपावर ठीक ठिकाणी आंदोलन करण्यात आले.

 

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: