गोवा 

‘केंद्र सरकारला गोव्याची काळजीच नाही’

विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांची खरमरीत टीका 

पणजी :
परवा भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गुजरात व दिवची हवाई पाहणी केली. काल पंतप्रधानानी घेतलेल्या विविध राज्यांच्या डिस्ट्रीक्ट मॅजिस्ट्रेटच्या बैठकीत गोव्याला स्थान देण्यात आले नाही. यावरुन भाजप सरकारला गोवा व गोमंतकीयांच्या यातनांचे काहिच पडलेले नाही हे स्पष्ट होत असल्याची टीका विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी केली. दक्षिण गोवा काँग्रेसच्यावतीने माजी पंतप्रधान राजीव गांधी यांना पुण्यतिथीनिमित्त आदरांजली वाहिल्यानंतर ते माध्यमांसोबत बोलत होते.

आज संपुर्ण देशात कोविड संसर्गाची सर्वाधिक लागण झालेल्यांत गोवा अगदी वरच्या स्थानावर आहे. ऑक्सिजन अभावी गोव्यात ७४ जणांचे प्राण गेले. आज कोविड लसिकरण व चाचणी यात गोवा अगदी शेवटच्या पातळीवर आहे. या परिस्थितीत गोव्याच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे बोलणे हे पंतप्रधानांचे कर्तव्य होते. परंतु, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल या राज्यांबरोबर पुडूचेरी राज्याला सुद्धा सदर बैठकीत सहभागी करुन घेताना पंतप्रधानांना गोव्याची आठवण झाली नाही हे धक्कादायक आहे, असे दिगंबर कामत म्हणाले.

digambar kamat
दिगंबर कामत

सन २०१४ मध्ये सत्तेत आल्यापासुन भाजपने गोव्याला सापत्नभावाची वागणुक दिली आहे. म्हादई पाणी वाटपात भाजप सरकारने गोव्याचा विश्वासघात केला. भाजपनेच बंद पाडलेला खाण व्यवसाय सुरू करण्यास केंद्रातील भाजप सरकार काहिच करीत नाही. गोव्याची अस्मिता नष्ट करुन इथे कोळसा हब करण्यासाठी भाजप सरकार प्रयत्न करीत आहे. पर्यावरण नष्ट करुन मोले येथे तीन प्रकल्पांचे काम पुढे रेटण्याचा भाजप सरकारचा प्रयत्न आहे ज्याचा फायदा केवळ क्रोनी क्लबला होणार आहे. भाजप सरकारने गोमंतकीयांना किनारी व्यवस्थापन आराखडा सुनावणीतही भाग घेण्यास दिल नाही. यावरुन भाजपची गोव्याच्या विरूद्धची भूमीका स्पष्ट होते.

आज राज्यातील भाजप सरकारला केंद्रातील भाजपचेच सरकार किम्मत देत नाही. राज्य सरकारचा रिमोट आज दिल्लीतील नेत्यांच्या हातात आहे. यामुळेच गोमंतकीयांना त्रास व कष्ट सहन करावे लागत आहेत असे दिगंबर कामत म्हणाले.
Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: