सातारा 

जनतेच्या पैशातून मुख्याधिकाऱ्यांची विमान भरारी

पाचगणी नगरपालिका घोटाळा भाग : ५

सातारा (महेश पवार) :
पाचगणी तात्कालीन मुख्याधिकारी यांनी दिल्ली येथील कामकाजासाठी चक्क विमान प्रवास हा नगरपालिका फंडातून केला असल्याची बाब उघड झाली आहे, मुख्याधिकारी यांनी या प्रवासासाठी वरिष्ठांची मान्यता देखील घेतलेली नव्हती.

मुख्याधिकारी यांनी याबाबत दिलेल्या खुलाशानुसार त्यांना न्यायिक कामकाजासाठी दिल्ली ला जावे लागले त्यामुळे  रेल्वेने जाणे शक्य नसल्याने त्यांनी विमान प्रवास केला. परंतु मुख्याधिकारी यांना कामकाजासाठी हजर राहणे आवश्यक होते तर त्याची नोटीस ७ दिवस आधी येते त्यामुळे त्यांना रेल्वेने प्रवास करणे शक्य होते, परंतु असे न करता त्यांनी कोणाचीही मान्यता न घेता विमान प्रवास केला.

कायदा काय सांगतो :
मुंबई नागरी सेवा नियम १९५९ मधील कलम ४१७ ब  आणि ४९० तसेच महाराष्ट्र शासन निर्णय वित्त विभाग प्रवास १०१०/प्र क्र.२/सेवा ५ दिनांक ०३ मार्च २०१० सुधारणा परिपत्रक ०१ ऑगस्ट २०१८ मधील मुद्दा क्रमानं ४(१) अ नुसार साचिवापेक्षा कमी दर्जाच्या अधिकाऱ्यास विमान प्रवास अनुज्ञेय नाही.

मग कायद्यात तरतूद नसताना मुख्याधिकारी यांनी विमान प्रवास केला कसा? सर्वसामान्य नागरिकांसाठी नियमावर बोट ठेवणारी नगरपालिका स्वतः मात्र नियमांचे तसेच शासन निर्णयांचे पालन करीत नसेल तर त्यांना दुसऱ्यांना नियम शिकवण्याचा नैतिक अधिकारी आहे का ? असा प्रश्न उपस्थित होतो.
Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: