गोवा 

चांदेल कासार्वरणे हसापुर वीज समस्येवर चर्चा

पेडणे (प्रतिनिधी) :
चांदेल-हसापुर व कासार्वरणे या भागात वारंवार होणाऱ्या वीज प्रवाह खंडित समस्ये विषयी पेडणे वीज सहाय्यक अभियंते वाटू सावंत यांच्याकडे पेडणे भाजपा मंडळ अध्यक्ष तुळसीदास गावस व उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांचे सचिव ज्ञानेश्वर परब आदींनी सविस्तर चर्चा केली. त्यावर सहाय्यक अभियंते वाटू सावंत यांनी वीज  समस्येविषयी प्रक्रिया सुरु केली आहे. वारंवार फिडर ट्रीप होत असल्याने हि समस्या होते आता त्यावर तात्पुरती सोय केल्याचे सांगितले.

पेडणे तालुक्यात वादळ वारा पाऊस नसतानाही वीज गायब होण्याचे प्रकार घडत असतात. वीज खाते मान्सून पूर्वच नव्हे तर अधून मधून आपल्या अधिकाराचा वापर करून अर्धा दिवस वीज पुरवठा खंडित करतात , त्यावेळी जुन्या वाहिन्या , वीज खांब बदलण्याचे काम करतात , शिवाय वीज वाहिन्यावर झाड्याच्या आलेल्या फांद्या छाटणे अशी कामे करतात . तरीही वादळ वारा नसताना वीज गुल्ल होण्याच्या प्रकारात मोठ्या प्रमाणात वाढ होते .

वारंवार होणाऱ्या वीज प्रवाह खंडित प्रकारावर आळा आघावा अशी मागणी पेडणे भाजपा मंडळ अध्यक्ष तुळसीदास गावास यांनी केली . त्यांनी सांगितले वीज फिडर निकामी बनत असल्याने हा प्रकार घडतो , अनेक वीज वाहिन्यावर झाडाच्या फांद्या आहेत त्या फांद्या छाटाव्यात अशी त्यांनी मागणी त्यांनी केली. तालुक्यात वारंवार वीज खंडित होत असल्याने त्याचा विपरीत परिणाम चांदेल पाणी प्रकल्पावर होत आहे ,विजेचेचा  लपंडाव जेवढा वाढत आहे त्याच गतीने जनतेला पाण्यासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे .

वीज खाते  हक्काने आपल्याला हवे तसे केव्हाही वीज खंडित करून ग्राहकांना मनस्थाप देत असतात ,मान्सून पूर्व कामाचे कारण देऊन  वीज गुल केली जाते ,मात्र हेरवीसुद्धा विजेचा लपंडाव चालू असतो त्याचा परिणाम पाणी पुरवठ्यावर होताना दिसत आहे .

पेडणे तालुक्यातील वीज प्रवाह खंडित होत असल्याने चांदेल पाणी प्रकल्पातून  जनतेला पाणी मिळत नाही ,24 तास पाणी पुरवठा करण्याची घोषणा सरकार करत असताना आज पेडणे तालुक्यात दिवसाला नियमित 2 तास पाणी मिळत नाही , पाणी विभाग वेगवेगळी कारणे सांगून जनतेला फसवण्याचे काम करत आहे . आम्हाला पाणी द्या म्हणून जनता लोकप्रतिनिधी मंत्री यांच्याकडे मागणी विनवणी करतात मात्र त्यांनाही यश मिळत नाही ,दररोज विजेचा लंडाव चालू असल्याने पाण्याचाही नित्याचाच खेळ सुरू आहे .

पेडणे पाणी विभाग जनतेला कधीच पूर्ववसुचना देत नाही की आज उद्या पाणी नसणार ,वीज लपंडाव हे एकमेव कारण सांगून पाण्याचा लपंडाव सुरू केला जातो. 24 तास नको निदान दिवसाला नियमित दोन तास तरी पाणी मिळाले तरी जनता समाधान मानू शकते .

हरमलचे पंच तथा सामाजिक कार्यकत्ये प्रवीण वायगणकर यांनी प्रतिक्रिया देताना हरमल आणि मतदार संघात वारंवार जसा पाण्याचा लंपडाव आहे तसाच विजेचा लपंडाव सुरु आहे . हरमल भागासाठी विजेचा फिडर केरीला आहे तिथे बिघाड झाला तर केरी पालये व हरमल या तीन गावाना फटका बसतो , आणि ११ केव्ही लाईन हि रानावनातून आली आहे , ती रस्त्याच्या बाजूने आणायला हवी , नाही तर वीज खात्याने हरमल गावासाठी मांद्रे या जवळच्या वीज फिडरवरून वीज प्रवाह द्यावा अशी मागणी केली , हि वीज समस्या कायम मिटवण्यासाठी किनारी भागात भूमिगत केबल घालून सोय करावी , शिवाय मांद्रे मतदार संघात पाणी  आणि विजेचा जो लपंडाव सुरु आहे , त्याविषयी एकदा तरी दोन्ही खात्याच्या मंत्र्यांनी आपल्या मतदारसंघा बाहेर जावून मांद्रेत येवून पहावे अशी मागणी केली आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: