पुणे 

‘पवारांमुळे आरक्षण मिळालं नाही हे पडळकरांचं म्हणणं योग्यच’

पुणे (अभयकुमार देशमुख) :
शरद पवार याच्याबद्दल गोपीचंद पडळकर यांनी जी भूमिका मांडली आहे, त्यात तथ्य आहे. शरद पवार हे राष्ट्रवादी आणि आताच्या महाविकास आघाडी सरकारचे गॉडफादर आहेत. त्यामुळेच पवारांमुळे मराठ्यांना आरक्षण मिळू शकले नाही, असे वक्तव्य करणाऱ्या भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांची भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पाठराखण केली आहे.

 

पडळकरांनी जी भूमिका मांडली आहे त्यात तथ्य आहे. पवार सगळ्यांचे गॅाडफादर आहेत. त्यांचा राज्य सरकारवर कंट्रोल आहे, तरीही आरक्षण का मिळत नाही? असा प्रश्न चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला आहे. मराठा आरक्षणाबाबत न्यायालयाने दिलेला निकाल पाहिला तर या महाविकास आघाडी सरकारने काय काय चुका केल्या हे त्या अहवालाच्या पानापानांवर दिसून येत असल्याची टीका पाटील यांनी केली आहे.  पुण्यात गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमानंतर पाटील बोलत होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: