गोवा 

‘शापोरा नदीवरचे अरिष्ट दूर कर रे म्हाराजा… ‘

पेडणे (निवृत्ती शिरोडकर) :
शापोरा नदीवर जे तरंगत्या जेटीच्या रूपाने अरिष्ट आले आहे, ते आता देवाने दूर करावे अश्या पद्धतीचे गाऱ्ह्याणे शापोरा नदीकिनारी असलेल्या दर्या सम्राट श्री वेताळ देवा सहित सर्व देव देवताना सामुदायिक गाऱ्हाणे ,जागृत नागरिक अमृत आगरवाडेकर यांच्या नेतृत्वाखाली घातले . यावेळी . प्रा. जनार्धन ताम्हणकर , पंढरी गोवेकर , साईश सांगलेकर , पांडुरंग वेंगुर्लेकर आदी उपस्थित होते .

सागरमाला या अंतर्गत शापोरा नदीत स्थानिक पंचायतीला  किंवा शापोरा नदीवर ज्यांचे जीवन उदरनिर्वाह अवलंबून आहे . त्याना विश्वासात न घेता सरकारने कंत्राटदार मार्फत तरंगती जेटी शापोरा नदीत शिवोलीच्या बाजूने तरंगती जेटी मागच्या आठदिवासापुर्वी घातलेली आहे , ती चोपडे बाजूने घालणार अशे आश्वासन कंत्राटदाराने दिले होते मात्र ते पाळणे नाही , मात्र त्या अगोदरच मोरजी चोपडे , आगरवाडा , पार्से तुये या भागातील जागृत नागरिकांनी या परिसरात कोणत्याच परिस्थितीत जेटीला थारा दिला जाणार नाही असा इशारा दिला , याविषयी आगरवाडा पंचायतीने विरोधी ठराव घेवून तो संबधित विभागाकडे पाठवला .

सरकार अजूनही कोणतीच पावुले उचलत नसल्याने हि जर जेटी हलवली नाही तर शिवोली व चोपडे या भागातील संयुक्तपणे नागरिकानी  आंदोलन छेडण्याचा इशारा दिलेला आहे .

त्याचाच एक भाग म्हणून काही जाणकार नागरिकांनी या आंदोलनाला देवाचा आशीर्वाद घेण्यासाठी सामुदायिक गाऱ्हाणे घालत आहेत . नद्यावर अवलंबून असलेल्या पारंपारिक व्यावसायिकावर संकट येणार आहे . त्यासाठी गावागावात जागृती  होवून आंदोलन तीव्र करण्याचा निर्धार केला जात आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: