गोवा 

‘शापोरा’ बचाव आंदोलन तात्पुरते स्थगित

पेडणे (प्रतिनिधी) :
सरकारने २१ जून पर्यंत जाहीर केलेला कर्फ्यु ,हवामान खात्याचा इशारा तसेच नदी परिवहन खात्याचे मंत्री मायकल लोबो यांनी जेटी पणजीत स्थलांतरित करण्याचे दिलेले आश्वासन या सर्व बाबींचा विचार करून शापोरा नदी बचाव समितीने बुधवार ( १६ जून) पासून पुकारलेले तरंगत्या जेटीविरुद्धचे आंदोलन  तूर्त स्थगित करण्यात  आले आहे.

सदर आंदोलन कायमचे स्थगित करण्यात आलेले नसून ते २५ जून पर्यंत पुढे ढकलण्यात आले आहे. २५ जून पर्यंत कामुर्ली येथील ती वादग्रस्त जेटी शापोरा नदीतून स्थलांतरित न केल्यास २७ जून रोजी आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यातआल्याचे शापोरा नदी बचाव समितीने कळवले आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: