गोवा 

पेडण्यात साठ हजार रुपयांचा चरस जप्त

पेडणे :
येथील पोलिसांनी राजेश जगदीश बनसाळ (३१)  या सिधी, मध्यप्रदेश येथील युवकाला हरमल येथे साठ हजार किमतीचा चरस बाळगल्याप्रकरणी अटक केली.

पेडणे पोलीस निरीक्षक जिवबा दळवी यांनी याबद्दल सांगितले कि, आमच्या खात्रीलायक सूत्राकडून एक नागरिक गोड्या पाण्याच्या तलावाजवळ  हरमल किनारी बेकायदा ड्रग्स व्यवहार करत असल्याची माहिती मिळाली. त्या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक जिवबा दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली एक पोलीस पथक २७ रोजी तलावाकडे दबा धरून बसले. तेव्हा त्याना एक संशयित युवक नजरेला आला.  पोलिसांनी संशयावरून त्याना ताब्यात घेतले आणि त्याची झडती घेतली तो जवळच्या एका गेस्ट हाऊस मध्ये राहत होता तिथे त्यांच्याकडे चरस सापडला. या चरसची किंमत बाजारात ६० हजार रुपये आहे.

पेडणे पोलिसांनी राजेशविरोधात भारतीय संहिता २० [b] [ ii] नुसार गुन्हा नोंद करून त्याला अटक केली. पोलीस निरीक्षक जिवबा दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विवेक हळणकर . कॉस्टेबल जनार्धन गावकर, देविदास मालकर, अनिश्कुमार पोके, रोहिदास म्हाळोजी आदींनी कामगिरी बजावली . पोलीस अधिक्षक उत्कृष्ट प्रसून व उपधीक्षक गजानन प्रभुदेसाई यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास चालू आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: