क्रीडा-अर्थमत

‘चिंगारी’ देतेय गोव्याला ‘ब्रीद’

​पणजी :​
चिंगारी हे ​आघाडीच्या आणि प्रमुख शॉर्ट व्हिडिओ अॅपने रोटरी इंटरनॅशनलच्या रोटरी डिस्ट्रिक्ट 3170 आणि बीईंग ह्यूमनसह चिंगारी अॅपच्या संयुक्त भागीदारी अंतर्गत ‘ब्रीद’ हा प्रकल्प आहे. याअंतर्गत संपूर्ण गोवा राज्यात कमी आरोग्य सुविधांच्या क्षेत्रात ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर प्रदान करण्याचे उद्दिष्ट निर्धारित करण्यात आले आहे. मागील काही आठवड्यांपासून ऑक्सिजनची मागणी पूर्ण करण्यासाठी संघर्ष करणाऱ्या क्षेत्रात ऑक्सिजनच्या पूर्ततेसह समाजाची सेवा करण्यासाठी चिंगारी पुढे आले आहे.​ ​
आपल्या कार्ययोजनेविषयी बोलताना, चिंगारी अॅपचे सीईओ आणि सह संस्थापक सुमित घोष म्हणाले, “ रोटरी इंटरनॅशनल आणि बीइंग ह्यूमन नेहमीच गरजू लोकांच्या मदतीसाठी पुढाकार घेत असतो आणि ते देशाच्या उज्ज्वल भविष्याच्या निर्मितीवर विशअवास ठेवणारे हे एक संघटन आहे. आपल्या लोकांसाठी उभे राहण्याची ही वेळ आहे. त्यामुळेच आम्ही इतर कोणताही विचार न करता ‘ब्रीद’ ला पुढे नेण्यासाठी पाठींबा दिला आहे. महामारीतून सावरण्यासाठी देश आणि टीम चिंगारी एकत्र ​ लढतील.​ ‘प्रोजेक्ट ‘ब्रीद’ अंतर्गत रोटरी डिस्ट्रिक्ट 3170 यानंतर ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर खरेदी करेल. हे या भागातील विविध रुग्णालयांमध्ये दिले जातील. या कॉन्सन्ट्रेटर्सचा वापर रुग्णालयात होम आयसोलेशन अंतर्गत उपचार घेणाऱ्या रुग्णांसाठी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर बँकेच्या स्वरुपात केला जाईल. यामुळे सध्या मोठया तणावाचा सामना करणाऱ्या रुग्णालयांवरील थोडे ओझे आम्ही कमी होईल.
चिंगारी आणि फायरसाइडच्या CovidCitizens.org सह भागीदारीमागील उद्देश म्हणजे, रोटरीसारख्या देशभरातील एनजीओंनी हाती घेतलेल्या विविध कोव्हिड संदर्भातील उपक्रमांना पाठींबा देणे होय.
chingariया भागीदारीविषयी प्रसिद्ध लेप्रोस्कोपिक सर्जन आणि रोटरी इंटरनॅशनलचे संचालक डॉ. भरत पंड्या म्हणाले, “रोटरी इंटरनॅशनल एक शतकापेक्षाही जास्त काळापासून जगभरात मानवतावादी उपक्रम राबवण्यात सर्वात अग्रभागी आहे. कोव्हिड काळातही रोटरीने कोव्हिड बचावाचे उपाय आणि उपाचारांच्या पायाभूत आराखड्याला पाठींबा देण्यासाठी जगभरात सुमारे 35 दशलक्ष डॉलर आणि फक्त भारतात 5 दशलक्ष डॉलर्स खर्च केले आहेत. या पवित्र कामाला पाठींबा देण्यासाठी रोटरीसह भागीदारी करण्यासाठी चिंगारी आणि बीईंग ह्यूमनचे आम्ही आभारी आहोत. भविष्यातही त्यांच्यासोबत भागीदारी करण्याची आम्ही आशा करतो.”
या भागीदारीविषयी बोलताना चिंगारी अॅपचे सह संस्थापक आणि सीओओ दीपक साळवी म्हणाले, “ देशासाठी हा कठीण काळ आहे. आपल्या लोकांची सेवा करण्यासाठी आपल्याकडून शक्य तेवढी मदत आपण केली पाहिजे. आपल्या कोरोना योद्ध्यांच्या मदतीसाठी आपण युद्धाच्या मैदानात उतरले पाहिजे. टीम चिंगारी ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे पीडित लोकांच्या मदतीसाठी सामाजिद जबाबदारी आणि कल्याणकारी उपक्रमाच्या भूमिकेतून आपले पूर्ण समर्थन देईल. जास्तीत जास्त लोकांनी एकत्र येत अशा काळात आजूबाजूच्या लोकांना शक्य तेवढी मदत करावी, असे आवाहन मी करतो.”​​
Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: