महाराष्ट्र

‘सर्वोच्च ज्ञानी व सोनिया सेनेचे प्रवक्ते संजय राऊत…’

मुंबई (अभयकुमार देशमुख) :
भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी आज एक व्हिडीओ प्रसारित करून शिवसेना नेते, खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांच्यावर उपरोधिक भाषेत टीका केली आहे.

काय म्हटले आहे या व्हिडिओत:

सर्वोच्च ज्ञानी व सोनिया सेनेचे प्रवक्ते संजय राऊत ह्यांनी आपल्या प्रात:कालीन सवयीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि देशातील तमाम बड्या नेत्यांना देण्यात आलेली सुरक्षा अनाठायी आहे असा जावईशोध  लावला आहे.

अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय  प्रश्नांवर अत्यंत परखड भूमिका मोदीजी घेत असतात अशावेळी त्यांची सुरक्षा ही राष्ट्रीय सुरक्षेचा विषय असतो
हे आपल्याला कितपत व कसे समजेल हे मला सांगता येणार नाही कारण हा विषय खूप मोठा आहे

तरी आपणास असे खरेच वाटत असेल तर आपल्या राज्याचे सन्माननीय यांची सुरक्षा काढून घ्यावी आणि स्वतःपासून आदर्श घालून द्यावा असा प्रयोग करायला काय हरकत आहे?
गेली दीड वर्ष मा.मुख्यमंत्रीजी हे त्यांचा बराच वेळ मातोश्री निवासस्थानी किंवा वर्षा या शासकीय बंगल्यावरच व्यतित करतात ते कुठे फारसे फिरत नाहीत त्यामुळे सध्या त्यांच्या सुरक्षेची तेवढी काळजी नाही.

तसेही आपले राष्ट्रीय पातळीवरील आस्त्तित्व बिहार निवडणूकीत मिळालेल्या मतांमुळे जनतेपुढे आलेले आहे. यामुळे आपल्याला मला सांगायचय संजय जी करायचे आहे की राष्ट्राची चिंता करण्यासाठी मोदीजी सक्षम आहेत

आपण आपले ज्ञान राज्य पातळीवर उपयोगात आणावे कारण लोकल बंद झाल्यामुळे जनतेची दैनंदिनी बिघडली आहे त्यांना हेलपाटा मारावा लागतोय.. जरा जास्त पाऊस पडला तर मुंबईची तुंबई होते या समस्यांवर आपल्या ज्ञानज्योतीचा प्रकाश पाडावा संजयजी​. ​

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: