गोवा 

चोपडे आगरवाडा, मोरोजी, तुये, पार्सेवासीयदेखील ‘त्या’ जेटीविरोधात 

पेडणे (निवृत्ती शिरोडकर) :
सध्या शिवोली बाजूने शापोरा नदीत असलेल्या तरंगती जेटी तेथून हलवून ती चोपडे या ठिकाणी उभारण्याचा प्रयत्न चालू असून आगरवाडा पंचायतीकडे परवानगीसाठी लेखी पत्र आल्याने पंचायत मंडळ , नागरिक खळवले असून त्या जेटीला तीव्र विरोध करण्याचा निर्धार ग्रामस्थ . जिल्हा पंचायत सदस्य व नागरिकांनी केला आहे .

शिवोली शापोरा नदीत मागच्या दोन दिवसापूर्वी एक तरंगती जेटी उभारण्यात आली होती , त्या जेटीला शिवोली भागातील नागरिकांनी तीव्र विरोध केल्यानंतर जेटी कंत्राटदराने चार दिवसात हि जेटी तेथुन हलवून ती चोपडे येथे कार्यरत केली जाईल असे आश्वासन दिले होते .आणि त्यानुसार ३ रोजी आगरवाडा पंचायतीकडे चोपडे शापोरा नदीत जेटी उभारण्यासाठी लेखी परवानगी मागणारे पत्र मिळाले . हे पत्र कॅप्टन ऑफ पोर्ट ने दिले आहे .

चोपडे शापोरा नदीत तरंगती जेटी कार्यरत होणार असल्याचे वृत्त प्रसिद्ध होताच या प्रकल्पाला विरोध करण्यासाठी गोवा फॉरवर्ड चे नेते दीपक कलंगुटकर , मोरजी जिल्हा पंचायत सदस्य , सतीश शेटगावकर , आगरवाडा माजी सरपंच अमोल राऊत ,माजी उपसरपंच रवींद्र राऊत ,टेक्सी व्यावसायिक संजय कोले , स्थानिक हेमंत चोपडेकर आदी घटनास्थळी जावून या प्रकल्पाला विरोध असल्याचे स्थानिक पत्रकारांकडे बोलताना सांगितले .

आमदार दयानंद सोपटे यांनी बोलताना जर स्थानिक पंचायत ,, स्थानिकाना याना नको असेल तर प्रकल्प लादला जाणार नाही , आमदार स्थानिकासोबत असणार मात्र प्रकल्प होवू देणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला . अश्या प्रकल्पाला आपला पाठींबा नाही , त्या प्रकल्पात कितीही मोठी व्यक्ती गुतली असेल तरी आंपण स्थानिकाबरोबरच असणार असे सांगून आपण कप्तान पोर्ट कडे संपर्क साधला तर सागरमाला अतर्गत राज्यात चार जेटी उभारण्यात येणार आहे , जेटी उभाराव्यात त्यास आपली हरकत नाही मात्र जिथे स्थानिकांचा विरोध होतो तिथ ती उभारू नये असे सोपटे म्हणाले .

 

 दीपक कलंगुटकर :
गोवा फॉरवर्ड चे नेते दीपक कलंगुटकर यांनी बोलताना शिवोलची जेटी जर चोपडेत आणली जाईल तर स्थानिकांना कोणतीच कल्पना नाही . जेटी का येते त्याची कारणे काय , कोण उभारतो , त्यातून कसला व्यवसाय होणार , त्याचा स्थानिकाना काय फायदा होईल याची काहीही माहिती नाही . सध्या ती तरंगती असेल कालांतराने ती कायमस्वरूपी होवू शकते . स्थानिकांच्या कित्येक वर्षाच्या मागण्या आहेत, शापोरा नदीकिनारी जुन्या जेटी धक्के आहेत ते कोसळून गेले ते बांधण्याची गरज आहे . ज्याची मागणी नाही ते प्रकल्प का लादले जातात असा सवाल करून आरोग्य खात्याचे हॉस्पिटल आहे पेडणे कोविड सेंटर आहे , त्या सुधारणा घडवून आणण्याची गरज होती ‘ प्रत्येकवेळी नको असलेले प्रकल्प पेडणेकरावर का लादले जाते , अगोदरच पेडणेतील जनतेच्या सरकारी प्रकल्पासाठी जमिनी गेलेल्या आहेत . इतर ठिकाणी जे प्रकल्प झिडकारले जातात ते प्रकल्प आमच्या पेडण्यातच कशाला असा सवाल करून त्याला आमचा विरोध असल्याचे सांगितले . पारंपारिक व्यवसायासाठी सरकारने अगोदर चालना द्यावी अशी मागणी दीपक कलंगुटकर यांनी केली .

सतीश शेटगावकर :
मोरजी जिल्हा पंचायत सदस्य सतीश शेटगावकर यांनी बोलताना जर या जेटीला शिवोली भागातून विरोध होतो तर मग काय मोरजी , आगरवाडा , पार्से पंचायत आणि नागरिक स्वागत करतील तर तो समाज चुकीचा आहे , या जेटीला आमचा विरोध आहे . कोणत्याही स्थिती आम्ही या जेटीला चोपडे भागात आणायला देणार नाही . वेळ प्रसंगी तीव्र विरोध करणार स्थानिक पारंपारिक मासे करणाऱ्या व्यावसायिकावर त्याचा परिणाम होणार आहे .

 

रवींद्र राऊत :
आगरवाडा माजी उपसरपंच रवींद्र राऊत यांनी बोलताना नागरिकाना नको असलेले प्रकल्प लादु नका , या जेटीचा स्थानिकाना किती फायदा व किती नुकसान याची अगोदर माहिती द्यावी अशी मागणी केली . आमचा विरोध असल्याचे त्यांनी सांगितले .

 

अमोल राऊत
आगरवाडा माजी सरपंच अमोल राऊत यांनी बोलताना स्थानिकांचा या जेटीला आमचा विरोध आहे , हि जेटी तरंगती असल्याने भविष्यात ते कुठेही नेऊ शकतात , या नदीत पारंपारिक पद्धतीने मासे मारी केली जाते , त्यांच्यावर त्याचा मोठा परिणाम होवू शकतो असे सांगून स्थानिक विरोध करणार असल्याचे सांगितले .

 

हेमंत चोपडेकर :
चोपडे येथील स्थानिक नागरिक हेमंत चोपडेकर यांनी बोलताना आमचे स्थानिक पंच नितीन चोपडेकर यांनी विरोध करण्यासाठी पंचायतीला पत्र दिले . या जेटीला आमचा विरोध आहे जेटी द्यायची असेल तर स्थानीक मासेमारी करतात त्याना जेटी द्या . कॅप्टन पोर्ट चे मंत्री मायकल लोबो यांनी त्वरीत हि जेटी इतरत्र हलवावी अशी मागणी केली .

संजय कोले :
स्थानिक व्यावसायिक संजय कोले यांनी बोलताना या जेटीला आमचा तीव्र विरोध आहे . स्थानिकाना विश्वासात न घेता दिल्लीच्या व्यावसायिकावर हे सरकार आहे का , डोंगर संपले , जमिनी गेल्या आता नद्याही त्यांच्या घश्यात घालणार का असा सवाल उपस्थित केला .

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: