गोवा 

गोव्यात सिनेशूटिंगवर बंदी कायम

पणजी: 
राज्यात कोविड संसर्ग वाढतोय. त्याला आळा घालण्यासाठी राज्य सरकार आपल्यापरिने आवश्यक त्या सर्व गोष्टी करत आहे. राज्यात मालिका आणि चित्रपटांच्या शुटिंगला परवानगी दिल्याने कोविडचा संसर्ग वाढला असा आरोप झाल्यानंतर राज्य सरकारने सगळे शुटिंग तातडीने बंद करण्याचे आदेश दिले होते. मात्र तरीही अजूनही राज्यात काही ठिकाणी शुटिंग सुरू असल्याचं नजरेस आलं आहे.
कोविडच्या वाढत्या संसर्गामुळे सध्या राज्यात चित्रीकरणासाठी बंदी आहे. तरीही राज्यातील काही खासगी ठिकाणी चित्रीकरण सुरू आहे. असं बेकायदेशीर कृत्य निदर्शनास आल्यास स्थानिक पोलिसांना कळवावं, असं आवाहन गोवा मनोरंजन संस्थेने (ईएसजी) केलं आहे. गोवा मनोरंजन संस्था लाईन निर्मात्यांमार्फत राज्यात चित्रपटाच्या शूटिंगला परवानगी देण्यासाठी नोंदणीकृत नोडल एजन्सी आहे. कोविडबाधित रुग्णांची संख्या वाढल्यामुळे 6 मे पासून चित्रीकरणसाठी दिलेली परवानगी संस्थेने रद्द केली होती. मात्र, सध्या काही ठिकाणी चित्रीकरण सुरू असल्याचं संस्थेच्या निदर्शनास आणून देण्यात आलं आहे. हे बेकायदेशीर आहे, असं संस्थेने पत्रकाद्वारे सांगितलं आहे.
याद्वारे सर्व संबंधितांना सूचना देण्यात आली आहे की सध्या राज्यात चित्रपट शूटिंग करणं कायद्याच्या विरोधात आहे. अशी बेकायदेशीर कृत्ये दिसल्यास त्यांच्याविरुद्ध आवश्यक ती कठोर कारवाई करण्यात येईल. असे प्रकार आढळल्यास स्थानिक पोलिस स्टेशनच्या ध्यानात आणू देण्याचं आवाहन गोंयकारांना केलं आहे.
Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: