गोवा 

‘१०० टक्के नागरिकांनी घ्यावी कोरोना लस’

पेडणे (प्रतिनिधी) :
मान्द्रे मतदारसंघातील १०० टक्के नागरिकांनी कोरोना लस घेवून आपले जीवन सुरक्षित ठेवा असे आवाहन मांद्रेचे आमदार  दयानंद सोपटे यांनी मान्द्रे जिल्हा पंचायत सभागृहात टीका उत्सव आयोजित केला होता त्या वेळी स्थानिक पत्रकारांकडे बोलताना सांगितले .

१८ ते ४५ वर्षाखालील नागरिकाना लस देण्याचा कार्यक्रम मांद्रे येथे आयोजित केला होता . मान्द्रेतील पंचायत सदस्य , आमदार दयानंद सोपटे यांच्या समर्थकांनी आपापल्या प्रभागात या विषयी जनजागृती केली होती. कोरोनाची महामारी दिवसेंदिवस वाढत आहे. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्र व राज्य सरकार जोरदार प्रयत्न करतात , त्याच प्रमाणे मांद्रेचे आमदार दयानंद सोपटे , पेडणेचे आमदार तथा उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर, आपापल्या मतदारसंघात टीका उत्सव यशस्वी करत आहे .

कोरोना महामारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आता जनतेने स्वतः वर बंधने घालून त्याची योग्य रीत्या अंमलबजावणी करायला हवी , केंद्र व राज्य सरकारच्या आरोग्य खात्याने घालून दिलेले नियम , कोरोनाचे नियम पाळले तर कोरोना टाळू शकतात , कोरोनाचे नियम पाळा आणि कोरोना टाळा असे आवाहन खाजगी आणि सरकारी क्षेत्रातील डॉक्टर वारंवार करतात , लोकांच्या निष्काळजीपणामुळे कोरोना वाढला असे मत डॉक्टर व्यक्त करत आहेत . त्यासाठी सर्वांनी काळजी घ्यावी असे आमदार दयानंद सोपटे यांनी सांगितले .

कोरोना ज्या व्यक्तीला झाला त्यांच्यापासून आम्हाला एक मीटर अंतरापासून दूर राहिलो तर तो होणार नाही . एकाकडून दुसऱ्याला तो संसर्ग गर्दीत आपण नियम पाळत नसल्याने होत आहे , जर आपण एक मीटर दुरी राखली , साबणाने परत परत हात धुतले , सेनिटायीझर वापरले , तोडावर मास्क घातले तर हा कोरोना कुणालाच होणार नाही .मात्र आज जनताच निष्काळजीपणामुळे वागत असल्याने आता हळू हळू खाजगी क्लिनिक बंद केली जात आहे , त्यामुळे इतर आजारावर उपचार करण्यासाठी डॉक्टरांची गैरसोय होत आहे .

पेडणेचे दोन्ही आमदार यांनी कोरोनाबाधित रुग्णांना मदत व्हावी यासाठी दोन्ही मतदारसंघात रुग्णवाहिका, आणि कोरोना सेंटर कार्यरत केले आहे. आजही दोन्ही लोकप्रतिनिधी रुग्णासाठी मदत कार्य करत आहेत त्याचा लाभ घेण्याचे आवाहन आमदार सोपटे यांनी केले.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: