गोवा 

‘लसीकरणासाठी नाही मुख्यमंत्र्यांकडे कोणतीही योजना’

आम आदमी पक्षाचे डॉ. प्रमोद सावंत यांच्यावर शरसंधान

पणजी :
विशेषज्ञ कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा अंदाज व्यक्त करत असूनही सर्व गोयंकरांच्या वेळीच लसीकरणासाठीची मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याकडे कोणतीही योजना नाही.  केवळ 15 लाख गोयंकरांचे 100 टक्के लसीकरण करण्यासाठी वास्तवात महिन्याचा कालावधी सावंत सरकारसाठी पुरेसा आहे. मात्र  यासाठी गोयंकरांना भाजप हायकमांडच्या दयेवर सोडलेले दिसते, असा आरोप आम आदमी पक्षाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
“सरकार एका वेळी फक्त 35 हजार लसींच्या कुप्या घेत आहे. परिणामी सरकार आपले अपयश लपविण्यासाठी दररोज मर्यादित लोकांचेच लसीकरण करत आहे. हा सर्व प्रकार अतिशय धक्कादायक आहे. याप्रकारच्या गतीने संपूर्ण गोव्याचे लसीकरण करण्यासाठी एका वर्षापेक्षा जास्त वेळ लागेल. आणि मग तिसरी लाट येईपर्यंत अधिक लोकांचा जीव जाईल.” असे आप गोव्याचे संयोजक राहुल म्हांबरे म्हणाले.

दुसऱ्या लाटेने बर्‍याच तरुणांवर परिणाम केला आहे, हे लक्षात घेणे महत्वाचे आहे. त्यातच विशेषज्ञांनी भाकीत केले आहे की, तिसरी लाट विशेषतः मुलांवर जास्त परिणाम करणारी असेल.  आत्तापर्यंत सूमारे 16246 लहान बालकांना आणि 17 वर्षाखालील तरुणांना कोरोनाची लागण झाली आहे, जी एकूण कोरोना बाधित संख्येच्या 11.34 % टक्के च्या आसपास आहे.

goa aap
राहुल म्हांबरे

सावंत सरकारने जर आवश्यक प्रमाणात लसींची खरेदी केली तर राज्यातील सर्व लोकसंख्येचे लसीकरण करणे सोपे होईल.  परंतु सरकारने कोणत्याही प्रकारच्या लसींच्या जागतिक निविदांचा तपशील जाहीर केलेला नाही किंवा केंद्रापर्यंत तशी मागणी पोहोचण्याचा प्रयत्न केला नाही. तसे केल्यास, असे दिसून येईल की भाजपा सरकार अपयशी ठरत आहे. गोवा भाजपा आपल्या हायकमांडला  नाराज करू इच्छित नाही, खाली पाहायला लावू इच्छित नाही. म्हणूनच मुख्यमंत्री सावंत गोव्याच्या हिताची मागणी केंद्राकडे मागताना कचरतात, असा आरोप यावेळी आपने केला आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: