गोवा 

मुख्यमंत्री- पंतप्रधान यांच्यात गोव्यातील स्तिथीबद्दल चर्चा

पणजी : 
मंगळवारी रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यामध्ये फोनवरुन चर्चा झाली. यावेळी पंतप्रधानांनी गोव्यातील स्थितीचा आढावा घेतला असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉक्टर सावंत यांनी दिली आहे. यावेळी ऑक्सिजन, बेड्सची सुविधा यासोबतच कोविड मॅनेजमेन्टबाबत काय उपाययोजना करण्यात आल्या आहेत, याची माहिती मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिली. पंतप्रधानांनी फोनवरुन संपर्क साधत मुख्यमंत्र्यांकडून गोव्यातील स्थितीचा एकूण आढावा घेतला.
मुख्यमंत्री आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात झालेल्या चर्चेदरम्यान ऑक्सिजनबाबत महत्त्वाचे निर्देश देण्यात आले आहे. ऑक्सिजनचा तुटवडा भासू नये, यासाठी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी महत्त्वाच्या निर्देशांचं पालन करत लवकरच ऑडिट केलं जाणार असल्याचं म्हटलंय. ते पत्रकारांशी बोलत होते. ऑक्सिजनची मागणी येत्या काळात वाढण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर सर्वतोपतरी यंत्रणा कामाला लावून काम करण्याचे प्रयत्न सुरु असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी म्हटलंय. दरम्यान, लसीकरणाला लवकरच सुरुवात केली जाईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
दरम्यान, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी बांबोळीतील सुपरस्पेशालिटी ब्लॉकची पाहणी केली. पुढील तीन दिवसांत १२० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर बसवणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली आहे. सरकारकडून चोख कोविड नियोजन सुरु असून पुढील दहा दिवसांत मृत्यूदर घटण्याचा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: