गोवा 

‘त्या’ शेतांची मुख्यमंत्र्यांनी केली पाहणी

पेडणे (निवृत्ती शिरोडकर) :
मोपा विमानतळ प्रकल्पाच्या बांधकाम कंपनीच्या हलगर्जीपणामुळे विमानतळ परिसरातील उगवे पंचायत क्षेत्रातील तसेच या परिसरात मोठ्या प्रमाणात चक्रीवादळाच्या दरम्यान पावसाचे पाणी साठवून मोपा विमानतळ प्रकल्पाला योग्य नियोजन नसल्याने त्याचं पाणी आणि दगड मोठ्या प्रमाणात येथील शेतात तसेच तुळसकर वाडी येथील शेतात घेऊन मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. या भागाची पाहणी करण्यासाठी खास मोपा विमानतळ प्रकल्पावर गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याबरोबर गोवा राज्याचे उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर,मोपा विमानतळ बांधकाम कंपनीचे सी.ई.ओ. आर.वि.शेषन, मोपा विमानतळ प्राधिकरणाचे अधिकारी शानबाग उपस्थित होते.

शुक्रवारी मोपा पठारावर ज्या ठिकाणी उगवे परिसरात पाणी वाहून शेतीची नासाडी झाली. त्या भागाची पाहणी केली तसेच मोपा विमानतळ पठाराच्या आणि बांधकामाची कामाची पाहणी मुख्यमंत्री यांनी करत मोपा विमानतळ बांधकामाचा कामाचा आढावा घेतला. यावेळी उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर, भाजप मंडळ अध्यक्ष तुळशीदास गावस,वारखंड नागझर पंचायतीचे सरपंच संजय तुळसकर, पंच मंदार परब, पंच प्रदीप कांबळी तसेच अधिकारी व या भागातील नागरिक मोठ्या संख्येने  उपस्थित होते.

यावेळी नुकसानग्रस्त भागातील नागरिकांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे नुकसान झालेल्या भागाची आणि पठारावरून येणाऱ्या पाण्यासंबंधीची माहिती दिली.

यावेळी माजी सरपंच शशिकांत महाले यांनी सांगितले की,आमचा मोपा विमानतळ प्रकल्पाला विरोध नाही मात्र कंपनीचे अधिकारी बेजबाबदारपणे वागत असल्याने या हलगर्जीपणामुळेच संपूर्ण पठार मोठ्या प्रमाणात व्यापलेला आहे,त्याचे पाणी आणि दगड शेती बागायती तसेच परिसरात येऊन गावातील पिढीजात शेतीची नासाडी झाली. याबद्दल शेतकऱ्यांची नुकसानभरपाई द्यावी त्याचबरोबर ती माती आणि दगड या कंपनीचे अधिकाऱ्यांनी तातडीने काढून आमची जमीन सुरक्षित ठेवावी,अशी मागणी महाले यांनी केली. यावेळी तुळशीदास गावस यांनी मोपा विमानतळ पठारावर जे काम सुरू आहे त्या कामाबाबत कंपनीच्या अधिकारी आणि कामगार वर्गाकडून हलगर्जीपणा झाल्यानेच याप्रसंगी उद्भवल्याचे सांगून मुख्यमंत्र्यांनी यात लक्ष घालून नागरिकांची समस्या सोडविण्याकडे प्राधान्य द्यावे, अशी मागणी केली. यावेळी मोपा पठारावर कामाची पाहणी मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी करत या कामाबद्दल समाधान व्यक्त करत विविध सूचना कंपनीच्या अधिकाऱ्यांना यावेळी त्यांनी दिल्या.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: