गोवा 

पेडण्यात मुख्यमंत्र्यांची शिष्टाई यशस्वी

पेडणे (निवृत्ती शिरोडकर) :

पेडणे  मतदारसंघातील मूळ भाजपा कार्यकर्त्यासोबत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी शिष्टाई केल्याने समेट घडवून आणला. आणि सर्व जुन्या कार्यकर्त्यांनी आपसातील मतभेद बाजूला ठेवून भाजपा सरकारचे हात बळकट करण्यासाठी आवाहन करताना या पुढे उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर याना साथ देण्याचे आवाहन कोरगाव येथे जुन्या भाजपा कार्यकर्त्यांच्या कोपरा बैठकीत केले.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे चार दिवसापूर्वी पेडणे मतदारसंघाच्या दौऱ्यावर आले होते त्यावेळी कोरगाव येथील मूळ भाजपा कार्यकर्त्यांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत व उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ व पारंपारिक समई देवून सत्कार केला.

२०१७ च्या निवडणुकीत भाजपाचे उमेदवार राजेंद्र आर्लेकर यांचा पराभव मगोचे उमेदवार बाबू आजगावकर यांनी केल्यानंतर मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी मगो पक्षाला सरकारात सामील करून घेतले आणि पेडणेचे आमदार बाबू आजगावकर याना क्रीडा व पर्यटन मंत्री हि पदे दिली .त्यानंतर २०१९ थेट मंत्री आजगावकर याना भाजपात प्रवेश देताना माजी मंत्री राजेंद्र आर्लेकर किंवा पेडणे भाजपा मंडळ आणि भाजपा कार्यकर्त्याना विश्वासात घेतले नव्हते .त्यामुळे जुने कार्यकर्ते आजपर्यंत भाजपच्या अर्थात स्थानिक आमदार बाबू आजगावकर यांच्या विरोधात कार्यरत होते .त्याचाच भाग म्हणून जिल्हा पंचायतीच्या निवडणुकीत मूळ भाजपा कार्यकर्त्यांनी विरोधात काम केले होते .

या कार्यकर्त्यामध्ये आणि उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर समेट घडवून आणण्यासाठी मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी खास कोपरा बैठकीचे कोरगाव येथे आयोजन करण्यात आले होते . या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी जुन्या  मूळ कार्यकर्त्याच्या समस्या , त्यांचे प्रश्न ऐकून घेतले आणि आगामी निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराला विजयी करण्याची सर्व जबाबदारी कार्यकर्त्यांनी उचलून बाबू आजगावकर याना साथ देण्याचे आवाहन केले , आणि कार्यकर्त्यांनी टाळ्या वाजवून स्वागत केले .

मोपा विमानतळ हा पेडणे तालुक्याबरोबरच राज्याच्या विकासासाठी महत्वाचा दुवा ठरणार आहे . नोकऱ्या बरोबरच अन्य लहान मोठ्या व्यवसायात पेडणे साठी प्राधान्य दिले जाईल ,असे आश्वासन मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी दिले.भारतीय जनता पार्टीचे सरकार विकासाला प्राधान्य देत असून निस्वार्थी आणि तळमळीच्या कार्यकर्त्यांच्या सहकार्याने पुढील विधानसभेची निवडणूक जिंकून भाजपचे सरकार पुन्हा जनतेने आणण्याचे मुख्यमंत्री सावंत यांनी आवाहन केले.

कोरगाव भटवाडी येथे प्रा. सुदान बर्वे यांच्या निवास्थानी झालेल्या कोरगावातील  भाजपच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या कोपरा बैठकीमध्ये ते बोलत होते . यावेळी व्यासपीठावर उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर , कोरगावचे माजी सरपंच पंढरी आरोलकर, प्रा.  सुदान बर्वे उपस्थित होते .

यावेळी दशरथ गावडे, कृष्णा गावडे , पंढरी आरोलकर सिद्धी शेट्ये आदींनी विचार मांडले.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: