गोवा 

आरोग्य यंत्रणा अखेर मुख्यमंत्र्यांच्या ताब्यात…

पणजी :
कालच जीएमसीमधील कोविड विभागाला भेट दिल्यानंतर आज त्यांनी मडगावात दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळाला भेट देऊन तेथील परिस्थितीची पाहणी केली. त्यातच काल राज्यात ७५ रुग्णांना आपला जीव गमवावा लागल्यानंतर अखेर आजपासून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी राज्यातील आरोग्य यंत्रणा आपल्या ताब्यात घेतली आहे.
गेल्या काही दिवसांत गोव्यातील कोविड रुग्णांच्या संख्येत आणि रुग्णांच्या मृत्यूमध्ये सातत्याने वाढच होत आहे. राज्यात ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे राज्यात सत्ताधारी पक्षातच ‘तू तू मै मै’ सुरु आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री विश्वजित  राणे यांनी कालच राज्यातील ऑक्सिजन पुरवठा व्यवस्थापन न्यायालयाने आपल्या ताब्यात घ्यावे तसेच जीएमसीमध्ये पहाटे २ ते ६ या काळात रुग्ण कसे दगावतात याचीही चोकशी करावी अशी थेट मागणी केल्यानंतर आरोग्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्यात आलबेल नसून, जीएमसीतील सगळा सावळा गोंधळ मुख्यमंत्र्यांच्या माथी मारण्याचा प्रयत्न केला. या सगळ्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आता राज्यातील आरोग्य यंत्रणाच आपल्या ताब्यात घेत आरोग्यमंत्र्यांवर कुरघोडी केली आहे.
दरम्यान, विश्वजित राणे यांच्याकडून आरोग्य खाते मुख्यमंत्र्यांनी आपल्या ताब्यात घ्यावे, अशी मागणी भाजपमध्ये जोर धरू लागली आहे. मंत्रीमंडळातील काही मंत्र्यांनीदेखील या मागणीला पाठिंबा दिला आहे. मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी अधिकृतरित्या जरी अद्याप आरोग्य खात्याचा ताबा घेतला नसला तरी अनधिकृतपणे त्यांनी आरोग्य गैरव्यवस्थापनाची घडी नीट बसविण्यासाठी सगळी सूत्रे आपल्या हाती घेतली आहेत.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: