सातारा 
Trending

जिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे ?  

 – अभयकुमार देशमुख

खरीपचा हंगाम तोंडावर आलेला असताना सातारा जिल्हाधिकारी शेखर सिंग यांनी २५ मे पासून कडक लॉकडॉउन करण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशामध्ये शेतकऱ्यांना खरीपच्या हंगामासाठी शेती उपयोगी साहित्य मिळणा-या कृषी केंद्रानांही सुट देण्यात आली नाही. जी सुट दिलीय ती देखील पुर्णपणे नामधारीच म्हणावी लागेल. कृषी केंद्राना सकाळी सात ते सायंकाळी पाच यावेळेत शेतकऱ्यांना घरपोच सेवा देण्याची मुभा देण्यात आली आहे. याचा शेतकरी वर्गाला फायदा होईल याची कसलीच शाश्वती नाही. कारण कृषी केंद्र चालवणारे व्यापारी घरपोच सेवा देण्यास तेवढे उत्सुक दिसत नाही. याचे कारण आर्थिक फटका बसण्याची देखील भिती व्यापाऱ्यांना सतावत असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे दोन्ही बाजूंचा विचार केला. तर जिल्ह्यधिका-यानी कडक लॉकडॉउनचा घेतलेला निर्णय शेतकऱ्यांना अडचणीचा ठरण्याची शक्यता आहे.

खरीपच्या हंगामात सर्व पिकांच्या पेरणीस साधारणपणे २५ मे नंतर सुरुवात होते. आडसाली उस, सोयाबिन, भुईमुग, भात यासारखी अनेक पिकं शेतकरी घेतात. शेतकऱ्यांना त्यासाठी योग्य वेळेत कृषी साहित्य उपलब्ध होणे आवश्यक आहे. मात्र वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यात कडक लॉकडॉउन करण्याचे आदेश जिल्हाधिका- यानी दिले आहेत. आणि त्याचा फटका शेतकऱ्यांना बसू शकतो.

शेतकऱ्यांना लागणारे शेती उपयोगी साहित्य मिळवण्यासाठी कृषी सेवा केंद्रात जाण्याची आवश्यकता भासते. मात्र २५ मे पासूनच्या कडक लॉकडॉउनच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना कृषी सेवा केंद्रात जाता येणार नाही. पर्यायाने २५ मे ते १ जून हा आठवडा वाया जाणार आहे. जिल्हा प्रशासनाने कृषी सेवा केंद्र सुरु न ठेवता. सकाळी सात ते सायंकाळी पाच पर्यंत घरपोच सेवा देण्याची मुभा कृषी व्यावसायिकांना दिली आहे. मात्र कृषी व्यावसाईकाना ते शक्य नसल्याचे कृषी व्यावसाईक खाजगीत बोलत आहेत. त्यामुळे शेतक-याना सद्याच्या आदेशानुसार एक आठवडा ताटकळत बसावे लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

यावर एकच पर्याय होऊ शकतो. शेतकऱ्यांना खरीप हंगामात लागणारे कृषी साहित्य म्हणजेच बी बियाने, खते,औषधे यांचा तुठवडा पडू नये याची काळजी जिल्हा प्रशासनाने घेणे आवश्यक आहे. कृषी केंद्र सुरु ठेवून शेतकऱ्यांना माल घेण्याची परवानगी देणे गरजेचे आहे.

कोरोना या विषाणूच्या जाळ्यात संपूर्ण जग अडकले आहे. त्यासाठी पोलिस, डॉक्टर, सफाई कर्मचारी, नर्स यासारखे अनेक कोविड योध्ये जिवाची पर्वा न करता लढत आहेत. प्रशासन त्यांच्यापरिने सर्व काही चांगले आणि व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करत आहे. पण हे झाले सद्यस्थितीतले. आणि कोरोना असेपर्यंत… पण शेतकऱ्यांना आता तोंडावर आलेल्या खरीप हंगामात साहित्यांचा तुडवडा पडला. तर बळीराजा पेरणी करण्यापासून मागे राहिल. आणि कोरोना संकट संपल्यानंतर आपल्या समोर उभे राहिल नवे संकट…आणि ते असेल अन्न धान्य तुटवड्याचे… त्यामुळे वेळीच सरकार आणि प्रशासनाने जागे होणे गरजेचे आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: