गोवा 

‘…म्हणून तानवडे झाले आहेत वैफल्यग्रस्त’

काँग्रेस प्रवक्त्या पल्लवी भगत यांचा पलटवार

मडगाव :
भाजपचा येत्या विधानसभा निवडणूकांत समोर दिसत असलेल्या पराभवाने प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे हे वैफल्यग्रस्त झाले असुन, विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत यांच्यावर त्यांनी केलेल्या बेताल वक्तव्याने त्यांचे मानसिक संतुलन बिघडल्याचे स्पष्ट होत आहे असा सणसणित पलटवार कॉंग्रेस प्रवक्त्या पल्लवी भगत यांनी केला आहे.

काल मडगावात भाजप अध्यक्ष्यांनी दिगंबर कामत यांना पक्षांतरावर बोलण्याचा अधिकार नसल्याचे वक्तव्य केले होते त्याचा समाचार घेताना कॉंग्रेस प्रवक्त्यांनी सदानंद शेट तानावडे यांच्यावर टीका केली आहे.

कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी भाजपमधून कॉंग्रेस पक्षात पक्षांतर केले नव्हते. त्यांनी आपल्या आमदारकीचा राजिनामा देवुन मडगावकराकडे आपल्या निर्णयावर मतदानाचा कौल मागितला होता व लोकांना त्यांना विजयी केले होते. सन २००५ च्या पोटनिवडणूकांनंतर, २००७, २०१२ तसेच २०१७ मध्ये मडगावकर मतदारांच्या भक्कम पाठिंब्याने दिगंबर कामत लोकप्रतिनिधी  म्हणुन निवडून आले आहेत. आगामी निवडणूकीतही ते प्रचंड मताधिक्क्याने निवडून येणार याचा आम्हाला पुर्ण विश्वास आहे असे पल्लवी भगत यांनी म्हटले आहे.

“फेक सही” फेम सदानंद तानावडे २००७ पासुन एक ही निवडणूक जिंकलेले नाहीत असा टोला पल्लवी भगत यांनी हाणला आहे.

गोव्यात भाजप सरकारने लोकांचा जनादेश डावलुन व विश्वासघात करुनच प्रत्येक वेळी सत्ता संपादन केली आहे. माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रिकर हे पक्षांतराचे प्रणेते होते. दिंगबर कामत यांचे सरकार उलथवण्याचा प्रयत्न त्यांनी २००७ ते २०१२ या काळात दोनदा केला होता याची आठवण पल्लवी भगत यांनी करुन दिली आहे.

Pallavi Bhagatलोकांचा आदर करणारे व कोणत्याही वेळी प्रसंगाला पावणारे दिगंबर कामत यांचा लोकसंपर्क दांडगा आहे. त्यांची जनमानसातील प्रतिमा पाहुन स्व. मनोहर पर्रिकरांना दिगंबर कामतांचा हेवा वाटायचा. भाजप प्रदेशाध्यक्षांनी मनोहर पर्रिकर हे  दिगंबर कामतांना पराभूत करण्यासाठी प्रयत्नरत होते हे स्पष्ट केल्याने दिगंबर कामत यांनी त्यावेळी भाजप सोडण्याचा घेतलेला निर्णय योग्यच होता हे स्पष्ट झालाचा दावा पल्लवी भगत  यांनी केला आहे.

मडगावात दिगंबर कामत विजयी झाल्यास आपण राजकारण संन्यास घेणार अशी घोषणा स्व. मनोहर पर्रिकर यांनी सन २००५ च्या पोट निवडणूकीवेळी लोहिया मैदानावर केली होती याची आठवण त्यांचा वारसा पुढे नेण्याची भाषा करणाऱ्यांनी लक्षात ठेवावी असे पल्लवी भगत यांनी म्हटले आहे.

भाजपने खोटारडेपणा करुनच गोव्यात सत्ता संपादन केली असुन, लोकांचा जनादेश चोरुन व पक्षांतरे घडवुन आणुन भाजप सरकारने सरकार चालविण्याचा प्रयत्न केला आहे.

विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत यांनी पक्षांतराला पुर्णविराम देण्यासाठी कठोर कायदा करण्याची मागणी करणारे विधेयक आगामी विधानसभेत मांडण्याचा प्रस्ताव दाखल केला असुन, भाजप अध्यक्ष सदानंद शेट तानावडेनी केलेल्या वक्तव्याने भारतीय जनता पार्टी पक्षांतराला आळा घालण्यास तयार नसल्याचे व त्यांना घोडा बाजार चालुच ठेवायचा असल्याचे स्पष्ट होत आहे.

आगामी निवडणूकीत मडगावात उमेदवार नव्हे तर पक्षाच्या चिन्हावर प्रचार करणार असल्याचे सदानंद शेट तानावडेंच्या वक्तव्याने भाजपची राजकीय दिवाळखोरी समोर आली आहे. भाजपची “लूट अज” निशाणी लोकांना मागील णव वर्षातील भाजपच्या गैरकारभाराची व लुटमारीची आठवण करुन देत राहील असा टोला पल्लवी भगत यांनी हाणला आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: