गोवा 

रविवारी काँग्रेसची ‘भूमिपुत्र यात्रा’

पणजी :

भाजप सरकारने या अधिवेशनामध्ये आणलेल्या भूमिपुत्र विधेयकावरून राज्यात बरेच रणकंदन झाले. सगळ्याच विरोधी पक्षांनी आणि नागरिकांनी  या विधेयकाला कडाडून विरोध केल्यानंतर  मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या विधेयकाचे नाव बदलले. असे असले तरी, विरोधकांनी भूमिपुत्र हा मुद्दा आता लावून धरला आहे.

त्यानुसारच राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसने रविवार, २९ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या मतदारसांघात, साखळी येथे भूमिपुत्र यात्रेचे आयोजन केले आहे. दुपारी ३:३० वाजता रवींद्र भवन येथून या भूमिपुत्र यात्रेची सुरुवात होणार असून सुमारे दहा हजार काँग्रेस कार्यकर्ते आणि नागरिक यामध्ये आपला सहभाग नोंदवणार असल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी सांगितले आहे.  कोरोनामुळे आवश्यक त्या सर्व नियमांचे पालन करत होणार असलेली हि यात्रा संध्याकाळी ६ वाजता साखळी बस स्टॉप येथे विसर्जित होईल.

साखळी विभाग काँग्रेस कमिटीच्यावतीने आयोजित या भूमिपुत्र यात्रेमध्ये काँग्रेसचे राज्यातील सर्व महत्वाचे नेते आणि पदाधिकारी सहभागी होणार असल्याचे सांगण्यात आले.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: