गोवा 

काँग्रेसच्या ‘क्रांति दिन’ निबंध स्पर्धेत मुली ठरल्या अव्वल 

मडगाव :
काँग्रेस पक्षाच्यावतीने ​घेण्यात आलेल्या क्रांति दिन विशेष निबंध स्पर्धेचा निकाल आज जाहीर झाला असून एकूण बारापैकी सात पारितोषिके मुलींनी तर पाच पारितोषिके मुलांनी पटकावली आहेत.  एकूण चार गटांपैकी तीन गटात मुलींनी प्रथम क्रमांक पटकावला आहे. या विजेत्यांना उद्या १८ रोजी होणाऱ्या कार्यक्रमात पारितोषिके प्रदान करण्यात येणार आहेत. 

​दरम्यान, पक्षाच्यावतीने शुक्रवार, १८ जून रोजी राज्याचा ७५ वा क्रांति दिवस साजरा करण्यात येणार आहे. राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे प्रभारी दिनेश गुंडू राव हे पक्षाच्यावतीने सकाळी ९.३०  वाजता मडगाव येथील लोहिया मैदानातील डॉ. राम मनोहर लोहिया यांच्या स्मारकाला पुष्पार्पण करतील. त्यानंतर संध्या. ४ वाजता हॉटेल ग्रेस मॅजेस्टिकच्या सभागृहात काँग्रेस नेत्यांच्या उपस्थितीमध्ये विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असल्याचे पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष एम. के. शेख यांनी सांगितले. आणि या संध्याकाळच्या कार्यक्रमात दिनेश गुंडू राव यांच्या हस्ते यावेळी पक्षाच्यावतीने आयोजित ‘गोवा क्रांति दिना’वरील निबंध स्पर्धेच्या विजेत्यांना पारितोषिकांचे वाटपही करण्यात येणार आहे. यावेळी माजी केंद्रीय मंत्री एदूआर्दो  फालेरो हे कार्यक्रमाचे बीजभाषण करतील.

निबंध स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे :​​
अ  गट विषय : 18 जून 1946 आणि लोकांचा उठाव
प्रथम : सिद्धि प्रकाश नाईक गांवकर
द्वितीय प्रणवी विनय तुबकी देसाई
तृतीय : शायना मिराशी

ब गट
विषय :  गोवा ६०  : आजवर आपण काय सध्या केले?
प्रथम : पार्थ मांगिरीश कंटक
द्वितीय अपेक्षा कृष्णा शेणवी कुंडे
तृतीय : रेयान ब्लाईस फर्नाडिस

क  गट
विषय : व्हिजन गोवा २०३० 
प्रथम : संजना रामनाथ नार्वेकर
द्वितीय गौरव देविदास किनेरकर
तृतीय :श्वेता लक्ष्मण गांवकर

ड  गट
विषय :  माध्यमांवरील बंधने (सेन्सॉरशिप) न्यायकारक आहेत का?
प्रथम : नूरजहाँ मुनाफ शेख
द्वितीय : जुड फर्नाडिस
तृतीय : सिद्धार्थ वस्त

प्रा. डॉ. मनोज कामत, प्रा. प्रशांती तळपणकर, प्रा. सुशीला सावंत मेंडीस,  प्रा. मनस्विनी कामत यांनी या स्पर्धेचे परीक्षण केले.

सदर कार्यक्रम कोरोनाचे सगळे आवश्यक ते नियम पाळून होणार असून, विजेत्यांनी मास्क घालूनच कार्यक्रमाला यावे, त्याचप्रमाणे येताना आपले छायाचित्र असलेले ओळखपत्र घेऊन यावे असे एम.के. शेख यांनी सांगितले आहे. स्पर्धेत सहभागी झालेल्या इतर स्पर्धकांना सहभागी प्रमाणपत्र यथावकाश प्रदान केली जातील, असेही पक्षाच्यावतीने कळवण्यात आले आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: