गोवा 

​’…काँग्रेससमोर सर्व पर्याय खुले’​

पणजी :

गोव्यातील भाजप सरकारचा विधानसभेच्या येत्या निवडणुकीत पराभव करण्यासाठी काँग्रेसने सर्व पर्याय खुले ठेवले असल्याची माहिती काँग्रेसचे राज्य प्रभारी दिनेश गुंडू राव यांनी येथे दिली.​ पणजीत काँग्रेस मुख्यालयात पत्रकार परिषदेत ​ते ​बोलत​ होते. यावेळी विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर​, रमाकांत खलप​ आदी नेते ​उपस्थित ​होते.  ​

काँग्रेसने भाजपला पराभूत करण्याचा निश्चय केलेला आहे. गोव्यात काँग्रेस पक्ष मजबूत असल्यामुळेच काँग्रेसशी आघाडी करण्यासाठी इतर अनेक पक्ष इच्छुक आहेत. भाजपला पराभूत करण्यासाठी जे काही निर्णय घ्यायचे असतील ते काँग्रेस पक्ष घेईल मात्र ते निर्णय काय असतील ते मी आताच सांगू शकत नाही.

गोव्यातील भाजप सरकारने कोविड महामारीच्या  काळात गोव्यातील जनतेचे संरक्षण केले नाही अपुऱ्या वैद्यकीय सोयी सुविधांमुळे ऑक्सिजन अभावी अनेक जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्या सगळ्यांची जबाबदारी सरकारने घेतली पाहिजे.

 

 

 

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: