देश-विदेश

‘या’ दिवशी मिळणार काँग्रेसला अध्यक्ष 

नवी दिल्ली : 
जून महिन्यातील २३ तारखेला काँग्रेस (congress) अध्यक्षपदाची निवडणूक पार पडणार आहे. काँग्रेस कार्यसमितीच्या बैठकीत संघटनेचे महासचिव केसी वेणुगोपाल यांनी निवडणूक तारखेची घोषणा केली आहे. या निवडणुकीनंतर काँग्रेसला अध्यक्ष मिळणार आहे. सध्या काँग्रेसचं हंगामी अध्यक्षपद सोनिया गांधी यांच्याकडे आहे.
काँग्रेसच्या २३ नेत्यांनी थेट गांधी घरण्याला आव्हान दिल्याने निवडणूक अटल होती. त्यामुळे यंदा काँग्रेसचा अध्यक्ष बिनविरोध निवडला जाण्याची शक्यता मावळली होती. अखेर कार्यसमितीच्या बैठकीत निवडणुकीची तारीख जाहीर करण्यात आली आहे. काँग्रेसला गांधी घरण्याऐवजी नवं नेतृत्व मिळाल्यास २०२४च्या लोकसभा निवडणुकीत तगडं आव्हान मिळू शकतं असं काँग्रेसमधील एका गटाचं म्हणणं आहे.
२०१९च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या पराभवासाठी राहुल गांधी यांच्यावर बोट दाखवण्यात आलं होतं. त्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाचा तडकाफडकी राजीनामा दिला. यामुळे काँग्रेस नेत्यांमध्ये मोठा पेच निर्माण झाला होता. दरम्यान राहुल गांधी यांचं मन वळवण्याचे अनेकांचे प्रयत्न अपयशी ठरले. त्यामुळे नवा अध्यक्ष मिळेपर्यंत हंगामी अध्यक्षपद सोनिया गांधी यांच्याकडे देण्यात आलं आहे. त्यामुळे या निवडणुकीच्या शर्यतीत कोण कोण असेल याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: