गोवा 

इंधन दरवाढीविरोधात राज्यभरात काँग्रेसचे आंदोलन सुरु 

मडगाव :
देशातील वाढत्या इंधन दरवाढी विरोधात कॉंग्रेस पक्षाने आज देश पातळीवर धरणे आंदोलन आयोजित केले होते. याचाच भाग म्हणुन गोवा प्रदेश कॉंग्रेस समिती तर्फे राज्यातील चाळीसही मतदारसंघातील विविध पेट्रोल पंपावर लक्षवेधी धरणे आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनाचा भाग म्हणून राज्याचे विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी मडगाव येथील पेट्रोल पंपावर कार्यकत्यांसह आंदोलन केले. तर पणजीमध्ये डॉन बॉस्को शाळेजवळील ठाकूर पेट्रोल पंपाजवळ गोवा प्रदेश युवा काँग्रेसच्यावतीने आणि कुंकळीमध्ये काँग्रेस नेते युरी आलेमाव, असीझ नोरोन्हा, अल्तिनो गोम्स आणि कार्यकर्त्यांच्या उपस्तिथीत पेट्रोल दरवाढीचा निषेध करण्यात आला. या आंदोलनाला स्थायिक नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

 

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: