गोवा 

कॉंग्रेसचा गोवा फॉरवर्डवर पलटवार

पणजी :
गोव्यात भाजपला पराभुत करुन स्थापन झालेले मडगाव नगरपालिका मंडळ हे गोव्यातील एकमेव आहे असे विधान करणाऱ्या गोवा फॉरवर्ड अध्यक्ष विजय सरदेसाई यांच्यावर कॉंग्रेस नेते आर्किटेक्ट तुलीयो डिसोजा यांनी पलटवार केला आहे.

कॉंग्रेसचे युवा नेते युरी आलेमाव यांच्या नेतृत्वाखाली व माजी मंत्री ज्योकीम आलेमाव यांच्या मार्गदर्शनाखाली कुंकळ्ळी नगरपालीकेतील बहुमतातील मंडळ हे कॉंग्रेस समर्थकांचेच आहे असे कॉंग्रेस प्रवक्ते आर्किटेक्ट तुलीयो डिसोजा यांनी म्हटले आहे. साखळी नगरपालीकेतही धर्मेश सगलानी यांनी न्यायालयीन लढा जिंकून भाजपला अद्दल घडवली याची आठवण केवळ आपणच राजकीय तज्ञ आहोत अशा भ्रमात असणाऱ्यांनी लक्षात ठेवली पाहिजे असे तुलीयो डिसोजा यांनी म्हटले आहे.

मडगाव नगरपालीकेतही कॉंग्रेस समर्थकांच्या भक्कम पाठींब्याने बिनविरोध पालीका मंडळ स्थापन झाले. गेल्या वेळेला कॉंग्रेस आमदार दिगंबर कामत यांचे सहा नगरसेवक निवडून आले होते. परंतु यंदा त्यांचे बळ आठ झाले. याउलट फातोर्डात ११ वरुन ९ वर संख्याबळ आलेल्यांनी चिंतन करणे गरजेचे आहे असा टोला तुलीयो डिसोजा यांनी विजय सरदेसाई यांचे नाव न घेता हाणला आहे.

tulio
तुलीयो डिसोजा

गोव्यातील काही स्वार्थी राजकारणी असत्य व खोटारडेपणा करुन आपला राजकीय फायदा साधण्याचा प्रयत्न करीत आहेत. केवळ आपल्यामुळेच कॉंग्रेस पक्ष तग धरु शकतो अशा भ्रमात ते वावरत आहेत. कॉंग्रेस पक्ष सत्याच्या आधारे राजकारण करीत असुन, लोकांचा विश्वास संपादन करुनच आम्ही पुढे जात आहोत असे तुलीयो डिसोजा म्हणाले.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: