google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
महाराष्ट्र

शामराव यादव यांनी दिला एक हात मदतीचा…

कल्याण :

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त ‘दि बुद्धिस्ट युथ’ संस्थेच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या विशेष कार्यक्रमामध्ये जिल्ह्याचे काँग्रेस सचिव शामराव यादव यांनी परिसरातील दिव्यांग बंधू मनजीत सिंग सैनी यांना पुढाकार घेऊन विशेष इलेक्ट्रिक बाईक भेट म्ह्णून प्रदान केली.

कोरोना काळानंतर दिव्यांग बंधूंवर मोठ्याप्रमाणात बेकारीची कुऱ्हाड कोसळली होती. कल्याण ग्रामीण मध्ये राहणारे मनजीत सिंग सैनी हे त्यापैकीच एक होते. कोरोना काळात त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले जोडीला त्यांच्या दिव्यांगपणामुळे त्यांना काही नोकरी- व्यवसाय करता येणे देखील शक्य होत नव्हते. कारण त्यांना घराबाहेर पडणेच जवळपास अशक्य झाले होते. त्यांच्या या अडचणीमुळे त्यांच्या कुटुंबावर मोठे संकटच आल्यासारखेच होते. सैनी कुटुंबीयांची हि अडचण शामराव यादव यांच्या लक्षात आल्याने त्यांनी त्यांना मदत करायचे ठरवले. पण सैनी कुटूंबियांना हि मदत आर्थिक स्वरूपात नको होती, तर त्यांना स्वबळावर पुढे जाण्यासाठी योग्य ते सहकार्य हवे होते. आणि नेमके हेच लक्षात घेत शामराव यादव यांनी  मनजीत सैनी याना खास दिव्यांगांसाठी बनवण्यात आलेली विशेष इलेक्ट्रिक बाईक भेट म्हणून दिली. त्यामुळे मनजीत यांना आता घराबाहेर जाण्यासाठी अन्य कोणावरही विसंबून राहण्याची गरज राहिलेली नाही. आणि ते त्यांचा व्यवसाय स्वतःच करू शकतात.

आपल्या या मदतीबद्दल बोलताना काँग्रेस कल्याण शहर जिल्ह्याचे सचिव शामराव यादव यांनी माध्यमांना सांगितले कि, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आयुष्यभर एका तत्वांचे अवलंबन प्रकर्षाने केले ते म्हणजे, दीन-दुबळ्यांना आवश्यक ती सगळी मदत करून त्यांना स्वतःच्या पायावर उभे करणे. मी या ठिकाणी फार काही वेगळी गोष्ट केलेली नाही. बाबासाहेबांचे विचार माझ्या आचरण्यात आणण्याचा हा एक अल्पसा प्रयत्न आहे. आमच्या मदतीमुळे जर मनजीत सैनी कुटूंबियांना प्रत्यक्ष- अप्रत्यक्ष काही मदर होणार असेल तर आम्हाला त्याचा आनंद नक्कीच आहे.

आपल्याला योग्यवेळी मिळालेल्या या मदतीवर मनजीत सैनी यांनी आणि त्यांच्या कुटूंबियांनी देखील आभार व्यक्त केले आहेत.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!