गोवा 

​काँग्रेसने केले सरकारच्या निर्णयाचे स्वागत ​

मडगाव ​:
गोवा शालांत मंडळाच्या यंदाच्या शैक्षणिक वर्षासाठी दहावीच्या परीक्षा रद्द करण्याच्या घोषणेचे मी स्वागत करतो. मुख्यमंत्र्यांनी शिक्षण क्षेत्रातील तज्ञांचा सल्ला घेवुन बारावीच्या परीक्षेबद्दल योग्य निर्णय लवकरच घ्यावा. सरकारने आगामी शैक्षणिक वर्षासाठी सर्व स्थरांसाठी कृती आराखडा आताच तयार करा​वा, असे आवाहन विरोधी पक्षनेते दिगंबर कामत ​​यांनी केले. 

शैक्षणिक व्यवस्थेसबंधी सर्व निर्णय हे तज्ञांचा सल्ला घेवुनच सरकारने घ्यावेत हे माझे मत अ​सू​न, विद्यार्थ्यांच्या भवितव्याचे विषय हाताळताना जाणकारांचे मत घेणे महत्वाचे अस​ते, असेही कामत यांनी सांगितले. ​

सरकारने आता ऑनलाईन प्रवेश परीक्षा तसेच योग्यता चाचणी परीक्षांसाठी व्यवस्थित नेटवर्क सुविधा उपलब्ध करुन देणे गरजेचे आहे. सदर परीक्षा घेण्यात येणाऱ्या केंद्रांवर अखंडीत नेटवर्क असणार याची खात्री सरकारने करुन घ्यावी. अखंडीत व उच्च दर्जाची नेटवर्क सुविधा उपलब्ध असल्यास विद्यार्थ्यानाही परीक्षा देताना लक्ष केंद्रीत करण्यास मदत होत​ असल्याकडे ​दिगंबर कामत यांनी लक्ष वेधले. 

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: