google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
गोवा

‘राज्यात काँग्रेसची पुर्नबांधणी करणार’

कुडतरी :
गोव्यात काँग्रेसच्या पुनर्बांधणीसाठी अनेक उपाय योजले जातील. तसेच जास्तीत जास्त युवकांच्या विकासावर भर दिला जाईल, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी कुडतरी येथे सांगितले ते काँग्रेस पक्षाच्या कार्यालयाचे उद्‍घाटन केले त्यावेळी बोलत होते.

 

पुढील चार वर्षे व दहा महिने काँग्रेस पक्ष प्रत्येक गोमंतकीयांच्या अगदी जवळ जाण्याचा प्रयत्न करेल. त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा व त्या सोडवण्याचा प्रयत्न करेल. पक्षाच्या पुनर्बांधणीसाठी पक्षाने गंभीरपणे पावले उचलली असून आपण स्वतः दिवसाचे १६ तास पक्षाच्या कार्याला वाहून घेतले आहे. कुडतरीच्या लोकांना सध्याच्या आमदाराबद्दल संभ्रम निर्माण झाला. आमदार खरोखरच अपक्ष की भाजपचा असे लोक विचारू लागले आहेत. कुडतरीचे लोक भाजपबरोबर कधीही जाणार नाहीत असा विश्वास अमित पाटकर यांनी या वेळी व्यक्त केला. यावेळी मोरेनो रिबेलो, कॅप्टन विरियातो फर्नांडिस, एम. के. शेख, सावियो डिसिल्वा यांनीही आपले विचार व्यक्त केले.

 

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!