गोवा 

सिंधुदुर्गला ऑक्सिजन देण्यावरून द. गोवा काँग्रेसची मुख्यमंत्र्यांवर टीका

 

मडगाव :
गोव्यात ऑक्सिजनची कमतरता असताना, सिंधुदुर्गला ऑक्सिजन पाठविण्याच्या आपल्या निर्णयावर गोव्यातून चौफेर टिका झाल्यानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Pramod sawant) यांनी आपल्या बेजबाबदार वक्तव्यातुन त्यांना गोमंतकीयांपेक्षा महाराष्ट्रातील लोकांबद्दल कळवळा असल्याचे परत एकदा सिद्ध केले आहे. गोव्यात ऑक्सिजनचा तुटवडा असल्यामुळे तडफडणाऱ्या कोविड रुग्णांचे आपणांस पडलेले नाही हे एक प्रकारे त्यांनी मान्य केल्याने गोमंतकीयांप्रती त्यांचा अमानुषपणा उघड झाला आहे अशी टिका दक्षिण गोवा जिल्हा कॉंग्रेस अध्यक्ष जोसेफ डायस यांनी केली आहे. सिंधदुर्गवासीयांची बाजू घेऊन बोलणाऱ्या मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोव्यातील रूग्णांना भाजप सरकार दुय्यम दर्जाची वागणुक देते हे मान्य केल्याचे जोसेफ डायस यांनी म्हटले आहे.विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत यांनी गोमंतकीयांना डावलुन सिंधुदुर्गात ऑक्सिजन पाठविण्याचा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंतांचा डाव उघड केल्याने मुख्यमंत्र्यानी काल दिगंबर कामत यांच्यावर बेताल आरोप केले. मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याचा आम्ही तिव्र निषेध करतो व त्यांनी आमच्या ज्येष्ठ व अनुभवी नेत्याची माफी मागावी अशी मागणी करतो असे जोसेफ डायस यांनी म्हटले आहे. कॉंग्रेस पक्षाने नेहमीच दुसऱ्यांना मदत करण्याचेच धोरण राबविले आहे. आम्हाला महाराष्ट्रच नव्हे तर संपुर्ण जगातील लोकांची चिंता आहे. परंतु, आपल्या लोकांची काळजी घेणे हे आमचे प्रथम कर्तव्य असुन, त्या नंतरच इतरांना मदत करावी असे जोसेफ डायस म्हणाले

pramod sawantगोव्यातील भाजप सरकारने नेहमीच गोमंतकीयांना दुय्यम दर्जाची वागणुक दिली आहे. आपल्या राजकीय स्वार्थासाठी भाजप सरकारने आमची जीवनदायीनी म्हादईचा कर्नाटकशी सौदा केला. गेल्या वर्षी राष्ट्रव्यापी लॉकडाऊनच्या वेळी गोमंतकीय खलाशांना सरकारकडुन सापत्नभावाची वागणुक देण्यात आली. आता गोमंतकीयांचे आरोग्य सांभाळण्याचे सोडुन मुख्यमंत्री महाराष्ट्रातील रुग्णांबद्दल चिंता व्यक्त करीत आहेत.

गोव्यातील भाजप सरकारचा बिगर गोमंतकीयांप्रती कळवळा व प्रेम उघड दिसत आहे. कर्नाटकातील एका उद्योगाला कोळसा वाहतुक करण्यासाठी पर्यावरण नश्ट करुन भाजप सरकारने रेल्वे दुपदरीकरणास परवानगी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या क्रोनी क्लबला मदत करण्यासाठी मोले अभयारण्याचा संहार करण्यासाठी भाजप सरकारने तयारी केली आहे. गोमंतकीयांना संपवुन गोवा राज्य मोदी-शहांच्या क्रोनी क्लबच्या घशात टाकण्याचा डाव भाजप सरकारचा आहे असे जोसेफ डायस म्हणाले.

भाजप सरकारने गोव्यातील कोविड व ऑक्सिजन व्यवस्थापनावर श्वेतपत्रीका जारी करण्याची धमक दाखवावी. आज लोक मदतीसाठी हाक मारत असताना भाजपचे नेते व कार्यकर्ते भूमिगत झाले आहेत. युवक कॉंग्रेस व महिला कॉंग्रेसचे कार्यकर्ते गरजुनां प्राणवायु व जेवण तसेच इतर मदत देत असताना, भाजपच्या आमदारांचाही कोठेच पत्ता नाही. राज्यभरातुन टिकेची झोड उठल्यानंतर आता कोठे भाजपचे नेतृत्व झोपेतुन जागे झाले असल्याची टीकाही डायस यांनी केली आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: