google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
सिनेनामा 

आणि आता ‘हा’ दाक्षिणात्य सिनेमा होणार हिंदीत प्रदर्शित



‘कनेक्ट’च्या तमिळ व्हर्जनला उत्कृष्ट प्रतिसाद मिळाल्यानंतर, या चित्रपटाच्या वाढत्या मागणीमुळे निर्मात्यांना नयनतारा अभिनीत या तमिळ हॉरर थ्रिलर सिनेमाला हिंदीमध्ये प्रदर्शित करण्यास भाग पाडले. अशातच, अखेरीस हा चित्रपट मोठ्या हिंदी रिलीजमध्ये आपले नाव नोंदवण्यास तयार आहे. तसेच, या वर्षी दक्षिणेतील अनेक दक्षिण भारतीय ब्लॉकबस्टर्स चित्रपटांनी जगभरातील प्रेक्षकांच्या हृदयावर राज्य केले असतानाच, ‘कनेक्ट’हा चित्रपट प्रेक्षकांशी उत्तम प्रकारे कनेक्ट होण्याचे वचन देतो, ज्याला पाहून असे वाटते की, साऊथच्या खजिन्यातील हा आणखी एक उत्तम चित्रपट आहे, जो प्रेक्षकांची मने जिंकण्यात यशस्वी होणार आहे. अशातच, नयनतारा अभिनीत ‘कनेक्ट’ चित्रपट 30 डिसेंबर रोजी हिंदीमध्ये प्रदर्शित होण्यासाठी सज्ज आहे.

‘केजीएफ’ (KGF), ‘कांतारा’ (Kantara), ‘आरआरआर’ (RRR), ‘विक्रम’ आणि ‘पुष्पा’ यांसारख्या चित्रपटांसह, दक्षिण भारतीय सिनेसृष्टीने आपल्या उत्कृष्ट कंटेन्टनसह सर्वांना प्रभावित केले आहे. तसेच, बॉक्स ऑफिसवर विक्रम रचण्यापासून ते प्रेक्षकांची मने जिंकण्यापर्यंत दक्षिण भारतीय चित्रपटांनी जगभरात ठसा उमटवला आहे.

आता नयनताराचा ‘कनेक्ट’हा चित्रपट 30 डिसेंबर रोजी हिंदी मार्केटमध्ये प्रदर्शित होण्यास तयार असून, असे दिसते की हा आणखी एक चित्रपट आहे जो आपल्या रिलीजसह यशाची उभारणी करेल. तसेच, या सर्व चित्रपटांनी त्यांच्या वेगवेगळ्या शैलींसह प्रेक्षकांचे मनोरंजन केले असतानाच, ‘कनेक्ट’ हा एक प्रकारचा हॉरर थ्रिलर चित्रपट आहे जो प्रेक्षकांना बऱ्याच काळानंतर चित्रपटगृहांमध्ये पाहायला मिळेल.


राउडी पिक्चर्स अंतर्गत विघ्नेश शिवन निर्मित, ‘कनेक्ट’या चित्रपटाचे दिग्दर्शन अश्विन सरवणन यांनी केले आहे. या चित्रपटात नयनतारा, सत्यराज, अनुपम खेर आणि विनय राय यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तसेच, अश्विन सरवणन आणि काव्या रामकुमारद्वारा लिखित हा चित्रपट 22 डिसेंबर रोजी तमिळ, तेलुगू आणि मल्याळममध्ये रिलीज झाला असून 30 डिसेंबर रोजी हिंदीमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!