मुंबई 

​मुंबईत घटताहेत कोरोना रुग्ण

मुंबई​:​

​आज मुंबईतील कोरोनाच्या रुग्णसंख्येत किंचितशी वाढ झाली आहे. ​गेल्या २४ तासांत 1,425 नवीन कोरोना रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. पण, मुंबईत नोंदवला घटता क्रम ही मुंबईकरांसाठी दिलासादायक बाब आहे. मुंबईत आज दिवसभरात नोंदवल्या गेलेल्या 1,425 नवीन रुग्णांची नोंद झाल्याने कोरोना बाधित रुग्णांची संख्या 6,93,664 झाली. तर दिवसभरात 59 रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 14,468 वर पोहोचला आहे.

​​दरम्यान, आज दिवसभरात 1,460 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने आतापर्यंत 6,47 623 रुग्णांनी कोरोनाला हरवले आहे. त्यामुळे मुंबईत सध्या 29,525 सक्रिय रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत.

मृत रुग्णांची संख्या- 59
एकूण चाचण्या – 29,361
बरे झालेल्यांचा दर – 93%
एकूण कोविड वाढीचा दर – 0.23%
दुपटीचा दर – 297 दिवस

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: