क्रीडा-अर्थमतगोवा 

गोवा ‘मणिपाल’मध्ये कोविड लसीकरणाला सुरुवात

पणजी :
१६ जानेवारी रोजी लसीकरणाच्या (Corona vaccination) दुसर्‍या टप्प्याची यशस्वी सुरूवात केल्यापासून गोव्यातील मणिपाल हॉस्पिटलने आजपर्यंत ७३८० हून अधिक- लोकांचे लसीकरण यशस्वीपणे पूर्ण  केले असून दररोज जवळजवळ १०० लोकांचे लसीकरण सध्या केले जात आहे. आता  हॉस्पिटल तर्फे ३ मे पासून १८-४५ वर्ष वयोगटातील लोकांचे ही लसीकरण सुरू केले आहे.
लसीकरणाविषयी माहिती देतांना  मणिपाल हॉस्पिटल गोव्याचे हॉस्पिटल डायरेक्टर मनीष त्रिवेदी यांनी सांगितले “आम्ही लसीकरणाची ३ मे पासून पुन्हा सुरूवात केली असून ही लस आता १८-४५ वर्ष वयोगटातील लोकांसाठीही उपलब्ध असेल. या लसीकरणासाठी ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक असून ही नोंदणी कोविन वेबसाईट किंवा आरोग्यसेतू ॲपच्या सहाय्याने करायची आहे.  आम्ही कोणत्याही परिस्थितीत ऑनलाईन नोंदणीशिवाय थेट प्रवेश देऊ शकणार नाही.  मी सर्वांना विनंती करतो की सर्व पात्र लोकांनी नोंदणी  करून  लसीकरण करून घ्यावे. या महामारी मध्ये सुरक्षा निकषांच्या म्हणजेच मास्क वापरणे,  सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे आणि नियमित सॅनिटायझेशन करणे व लसीकरण हेच उपाय सध्या उपलब्ध आहेत. कोविड-१९ साठी असलेले ‍निकष पाळून डॉक्टरांनी आणि रूग्णालयातील कर्मचार्‍यांनी रूग्णांसाठी सकारात्मक वातावरणाची निर्मिती केल्या बद्दल मी त्यांचा आभारी आहे.  हॉस्पिटल कडून सोशल डिस्टन्सिंग, मास्क वापरणे, सॅनिटायझेशन स्टेशन्स ची ठिकठिकाणी सोय करणे  इत्यादी सुविधांचे संपूर्ण प्रक्रियेत कठोरतेने पालन केले जात आहे.”
हॉस्पिटलकडून कोव्हॅक्सिन ही लस (Corona vaccination)  प्रती डोस रू १३५०/-  या दरात (रू १२०० ही उत्पादनाचा खर्च आणि १५० रू लसीकरण करण्यासाठी रूग्णालयाचा प्रशासकीय खर्च) उपलब्ध करून दिली जात आहे.  नोंदणी प्रक्रिया ही १ मे २०२१ पासून सुरू करण्यात आली असून आजमितीस एकूण  ९०० लोकांनी नोंदणी केली आहे.  हॉस्पिटल कडून रोजचे १५० स्लॉट्स निर्माण केले असून त्यामुळे ८ मे पर्यंतची सर्व नोंदणी पूर्ण झाली आहे. ९ मे आणि  त्यापुढील तारखाचे सर्व स्लॉट्स हे लोकांसाठी पुढील आठवड्यापासून सुरु करण्यात येतील.
Corona vaccinationते पुढे म्हणाले “ कोविड-१९ लसीकरणाच्या दुसर्‍या टप्प्याची सुरूवात झाल्यापासून गोव्यातील लोकांकडून आंम्हाला  चांगला प्रतिसाद दिला आहे. आजपर्यंत एकूण ७३८० लोकांनी नोंदणी केली असून त्यांतील ३८३१ लोक हे ६० वर्षांवरील आहेत. १ एप्रिल पूर्वी आम्ही ४५ ते५९ वर्ष वयोगटातील को मॉर्बिडीटी असलेल्या २३१८ लोकांचे लसिकरण पूर्ण केले आहे. १ एप्रिल नंतर ज्यावेळी ४५ हून अधिक वर्ष वयोगटातील लोकांसाठी लसीकरण  सुरू झाले.  लसीकरण  करून झाल्यावर ती घेणार्‍या लोकांना कोणताही त्रास झाला नाही.  अगदी  थोड्या लोकांमध्ये दुसर्‍या दिवशी अंगदुखी किंवा ताप यांसारखी लक्षणे दिसून  आली.  एकूण  नोंदणी केलेल्या आणि  लस घेतलेल्या ७३८०  लोकांपैकी ६० टक्क्यांहून अधिक लोकांना मधुमेह,  हृदयरोग इत्यादी आजार होते.  आम्ही १२३१ आघाडीच्या आणि आरोग्यसेवा प्रदात्यांना लसीचा  दुसरा डोसही दिला.”

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: