देश-विदेश

‘या’ औषधामुळे नाही लागणार रुग्णाला ऑक्सिजनची गरज?

हैद्राबाद :
ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया(DCGI) ने कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी आणखी एका औषधाला आपत्कालीन वापरासाठी मंजुरी दिली आहे. हे औषध डीआरडीओच्या इंस्टिट्यूट ऑफ न्यूक्लिअर मेडिसिन अँन्ड सायन्स(INMAS) आणि हैदराबाद सेंटर फॉर सेल्यूलर एन्ड मॉलिक्युलर बायोलॉजी यांनी एकत्रितपणे तयार केले असून या औषधामुळे ऑक्सिजनची गरज रुग्णाला फारसी लागणार नाही असा दावा करण्यात येत आहे.
या औषधाला 2 Deoxy D glucose(2 DG) असं नाव देण्यात आलं आहे. त्याच्या उत्पादनाची जबाबदारी हैदराबाद येथील डॉ. रेड्डी लॅबोरेंट्रीजला देण्यात आली आहे. हे औषध क्लीनिकल चाचणीत यशस्वी ठरलं आहे. दावा आहे की, या औषधाचा वापर ज्या रुग्णांवर केला गेला त्यांच्यात वेगाने बरे होण्याचे प्रमाण दिसले. त्याचसोबत जे रुग्ण ऑक्सिजनवर निर्भर होते ते कमी झाले. या औषधाच्या वापरामुळे रुग्णांचा कोरोना रिपोर्ट इतर रुग्णांच्या तुलनेत लवकर निगेटिव्ह आला आहे. म्हणजेच हे रुग्ण लवकर बरे होत आहेत.
डीआरडीओच्या वैज्ञानिकांनी एप्रिल २०२० मध्ये लॅबमध्ये या औषधावर प्रयोग केला होता.
DGCIया प्रयोगात कळालं की, हे औषध कोरोना व्हायरस रोखण्यासाठी मदत करू शकतं. त्याआधारे DCGI ने मे २०२० मध्ये या औषधाच्या फेज २च्या चाचणीसाठी मान्यता दिली. फेज २ मध्ये देशातील हॉस्पिटलमध्ये या औषधाची चाचणी घेण्यात आली. फेज २ ए चाचणीचे ६ आणि फेज २ बी चाचणी ११ हॉस्पिटलमध्ये केली. ११० रुग्णांचा यात समावेश होता. ही ट्रायल मे ते ऑक्टोबर दरम्यान घेतली गेली. त्याचा परिणाम असा झाला की, ज्या रुग्णांना हे औषध दिलं ते इतरांच्या तुलनेत लवकर बरे झाले. चाचणीत सहभागी रुग्ण दुसऱ्या रुग्णांच्या तुलनेत २.५ दिवस आधीच ठणठणीत झाले.
हे औषध पावडरच्या स्वरुपात दिलं जातं. जे पाण्यात मिसळून प्यायचं असतं. हे औषधं संक्रमित कोशिकांमध्ये जमा होतं आणि व्हायरल सिंथेसिस आणि एनर्जी निर्माण करणाऱ्या व्हायरसला रोखतं. हे औषध खूप फायदेशीर ठरत आहे. देशात वाढत्या रुग्णसंख्येमुळे रुग्णांना बेड आणि ऑक्सिजनची कमतरता भासत आहे. अशातच या औषधाच्या वापरामुळे रुग्णांना जास्त काळ हॉस्पिटलमध्ये थांबण्याची गरज पडणार नाही असं दावा केला जात आहे.
Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: