गोवा 

‘दोन महिन्यात सुरु होणार तुयेत सरकारी कोविड केअर सेंटर’

​पेडणे :
कोरोना महामारीच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी पेडण्यातील तुये सरकारी हॉस्पिटलची नवी इमारत दोन महिन्यांच्या आत 50 खाटांसह तयारी करणार असल्याचं मांद्रेचे आमदार दयानंद सोपटे यांनी सांगितलं. सरकारी अधिकाऱ्यांसह तुये सरकारी हॉस्पिटलच्या नव्या इमारतीची त्यांनी मंगळवारी पहाणी केली. यावेळी ते बोलत होते.

यावेळी आमदार  सोपटेंसोबत तुये सरकारी हॉस्पिटलमधील कोविड विभागासाठी नियुक्त करण्यात आलेले नोडल ​​ऑफिसर गुरुदास पिळर्णकर, पेडणे सरकारी हॉस्पिटलच्या आरोग्य अधिकारी डॉ. विद्या परब, नमिता आजगावकर, सरकारी अभियंता रोहन साळगावकर, अभियंता श्रीकांत पाटील, उपजिल्हाधिकारी रवीशंकर निपाणीकर आणि मामलेदार अनंत मळिक उपस्थित होते.

जरी रक्ताची नाती नसली, तरी  सर्व लोक हे आमचेच आहेत. कुणालाही कसली कमतरता पडू नये किंवा कुणाची गैरसोय होऊ नये तसंच प्रत्येकाला चांगली वैद्यकीय सेवा मिळावी हाच सरकारचा प्रयत्न आहे. त्यासाठी कसलाही भेदभाव करणार नाही. तुये सरकारी हॉस्पिटलमधील कोविड केंद्र सुरू करण्यात कसली समस्या निर्माण होत असल्यास किंवा आर्थिक प्रश्न निर्माण झाल्यास माझ्याशी संपर्क साधावा. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंतांशी बोलून अशा समस्या सोडवल्या जातील. तसंच पेडणे तालुक्यातील जनतेला अशा परिस्थितीत धावपळ करावी लागणार नाही, असं सोपटे म्हणाले.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: