सातारा 

टॉप गियर ग्रुप व आर्ट ऑफ लिव्हिंगची सामाजिक बांधिलकी

सातारा (महेश पवार):
आर्ट ऑफ लिव्हिंग परिवार, टॉप गियर ट्रान्समिशन प्रायव्हेट लिमिटेड व ग्रामपंचायत देगाव यांच्या संयुक्त विद्यमाने देगाव ता.सातारा येथे श्री श्री कोविड सेन्टरचा शुभारंभ तहसीलदार आशा होळकर, यांचे हस्ते करण्यात आला. यावेळी टॉप गियर ग्रुप चे प्रमुख श्रीकांत पवार, मासचे अध्यक्ष उदय देशमुख, आर्ट ऑफ लिव्हिंगचे उमेश शिंदे यांचे उपस्थितीत होते.

देगाव हे सातारा औद्योगिक क्षेत्राला लागून असलेने आणि येथील कोविड रुग्णाची वाढती संख्या आणि मृत्यूचे प्रमाण पाहून हा तातडीचा निर्णय घेणेत आला. या सेटंर मध्ये तीस बेडची सुविधा असून ऑक्सिजन,बॅकअप जनरेटरसह, वाफारा मशीन, फळे, नास्ता, जेवण,औषधे, गरम पाणी, अँबुलन्स इत्यादींच्या सर्व सोयी आर्ट ऑफ लिविंग तर्फे मोफत करणेत आली आहे. तसेंच अनेक ग्रामस्थांनी वस्तू स्वरूपात मदत केली आहे. रुग्णसाठी दररोजच्या दिनक्रमात योगा, प्राणायम, मेडिटेशन, असणार आहे. तरी देगाव व परिसरातील कोविड रुग्णांनी याचा लाभ घ्यावा आणि ब्रेक द चेन या मोहिमेस सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे. या सेंटर सुरू करण्यात देगांव  मधील अनेक युवक, ग्रामसेवक मोहन कोळी , तलाठी कांबळे, आशा सेविका यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या सेंटरचे दैनंदिन कामकाजाचे नियोजन  सरपंच सौ.  यादव,  श्रद्धा पवार, सुहास फरांदे हे करत असून डॉक्टर फडतरे दांम्पत्य रूग्णांची काळजी घेत असल्याने रुग्णांना दिलासा मिळत आहे.

 

covid center

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: