गोवा 

मालभाट येथे मोफत कोविड चाचणी केंद्र सुरू

मडगाव :
विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत यांनी चार दिवसांमागे केलेल्या मागणीला अनुसरून सरकारने आज मालभाट-मडगाव येथे मोफत कोविड चाचणी केंद्र सुरू केले.

ॲंटीजन प्रणालीने कोविड चाचणी करण्यात येणार असुन, आठवड्यातील सर्व दिवस सकाळी ९ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत हे चाचणी केंद्र कार्यरत राहणार असल्याची माहिती केंद्र प्रमुख डॉ. विनोला गोम्स यांवी दिली. त्यांना सहाय्य करण्यासाठी केंद्रावर चार परिचारीकांची नेमणुक करण्यात आली आहे.

दक्षिण गोवा जिल्हाधिकारी तसेच आरोग्य सेवा संचालनालयाने त्वरित या कोविड चाचणी केंद्राची स्थापना करण्यात महत्वाची भूमिका बजावली म्हणुन मी त्यांचे अभिनंदन करतो. डॉ. विनोला गोम्स व इतर परिचारीकांनी केंद्रावर हजर राहुन योग्य व्यवस्था केल्या बद्दल मी त्यांचा आभारी आहे असे दिगंबर कामत म्हणाले.

मुख्यमंत्री व आरोग्यमंत्र्यांनी हे केंद्र सुरू करण्यास लगेच हिरवा कंदिल दाखवला. कोविडची तिसरी लाट रोखण्यात ह्या केंद्राची मदत होणार आहे. गरज भासल्यास याच केंद्रावर आरटिपिसीआर टेस्ट करण्याची तयारी सरकारने ठेवावी असे दिगंबर कामत यांनी सुचविले आहे. कोणताही औपचारीक कार्यक्रम न करता सरळ चाचणी सेवा सुरू करण्याची विनंती मी डॉक्टरांना केल्याचे दिगंबर कामत म्हणाले.

मडगावचे आमदार आज सकाळपासुन केंद्रावर हजर होते व त्यांनी सर्व व्यवस्था करुन दिल्यानेच चाचणी सुरू करणे शक्य झाले. चार दिवसां अगोदर दिगंबर कामत यांनी सदर जागेची उप-जिल्हाधिकारी व इतर सरकारी अधिकाऱ्यांसोबत पाहणी केली होती व चाचणी केंद्र सुरू करण्याची सरकारकडे मागणी केली होती.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: