गोवा 

”यांना’ही द्या फ्रंटलाईन वर्करचा दर्जा’

मडगाव:
गोव्यातील मेडिकल स्टोअर्स व औषध वितरकांनी कोविड संकटकाळात औषधांचे योग्य वितरण व उपलब्धता याचे योग्य नियोजन केले आहे. त्या सर्वांना कोविड फ्रंटलाईन वर्कसचा दर्जा देणे गरजेचे आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ताबडतोब याची दखल घेऊन सबंधित अधिकाऱ्यांना त्यासबंधी निर्देश जारी करण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत यांनी केली आहे.

आज कोविड महामारीत औषधांचा पुरवठा व उपलब्धता योग्य प्रमाणांत होणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे या क्षेत्रातील सर्व आस्थापनांचे मालक, कर्मचारी व इतरांना कोविड फ्रंटलाईन वर्कसचा दर्जा देवुन त्यांना कोविड लस मिळवीण्यासाठी प्राधान्य देणे गरजेचे आहे.

फार्मा क्षेत्रातील सर्वांनी कोविड संकट काळात खुप मोठे योगदान दिले आहे. राष्ट्रव्यापी लॉकडाऊन असतानाही अहोरात्र काम करुन त्यांनी औषध पुरवठा सुरळीत राखण्यात महत्वाची कामगिरी बजावली आहे. फार्मा क्षेत्रातील सर्वांचे मी देशासाठी केलेल्या योगदानाबद्दल अभिनंदन करतो.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: