गोवा 

भोम मोपा येथे एकाचा निर्घृण खून

पेडणे (निवृत्ती शिरोडकर ) :

संक्राळ तोरसे येथील चंद्रकांत बांदेकर वय ५५ वर्षीय नागरिकांचा भोम मोपा येथे खून करून मृतदेह भोम मैदानाजवळ असलेल्या मातीच्या वाटेवर शुक्रवारी २ रोजी संध्याकाळी सापडला.

चंद्रकांत बांदेकर यांच्या अंगावर, छातीवर धारदार हत्यारांनी वार करुन खून करुन मृतदेह भोम मोपा येथे संध्याकाळी दृष्टीस पडल्यानंतर पेडणे पोलिसांना कळविण्यात आले. मृतदेहाचा अंगावर धारधार शस्त्राच्या खूणा असून हा खून कोण व का केला अशी चर्चा सुरू आहे.

पेडणे पोलीस निरीक्षक जीवबा दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली मृतदेह ज्या ठिकाणी सापडला त्याचा पंचनामा करण्यात आला.

ज्या ठिकाणी मृतदेह सापडला त्या ठिकाणी त्याची अॕक्टिव्ह दुचाकी जीए ११एफ ७१४२ वाहन सापडले. चंद्रकांत यांनी हेल्मेट परिधान केले होते. तर त्याची दुचाकी मृतदेहा शेजारी उभी होती.

चंद्रकांत बांदेकर हे संक्राळ पत्रदेवी येथी रेती व्यवसाय करत होते. मनमिळावू असलेला चंद्रकांत हे चांगल्या स्वभावाचे होते. त्यांचा पश्चात्य पत्नी आणि एक २२ वर्षांची मुलगी आहे.

दरम्यान, पोलिसांनी मृतदेह शवचिकित्सासाठी बांबोळी येथे गोवा मेडिकल इस्पितळात येथे पाठवला आहे.
खून कोणी व का केला यांचा पेडणे पोलीस तपास करीत आहे.

मोपा येथे दुपारी मुख्यमंत्री डाॕ.प्रमोद सावंत कार्यक्रमाला उपस्थित

मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी मोपा परिसरात भेट दिली आणि त्याच दिवशी त्या भागात खून झाला, याविषयी चर्चा चालू आहे . मोपा येथे मुख्यमंत्री आले तेव्हा मोठ्या प्रमाणात त्यांच्या सोबत पोलीस फौजफाटा तसेच सरकारी अधिकारी यांचा ताफा होता. खून झाला ठिकाणी दुपारी त्यामार्गाने आतील रस्त्याच्या बाजूला चारपाचजण युवक असल्याची चर्चा असून अनेकांनी त्यांना पाहिले आहेत. त्यामुळे सक्राळ येथील चंद्रकांत याला त्याठिकाणी बोलवून खून केल्याचा संशय असून तशी चर्चा पेडणे तालुक्यात आहे.
चंद्रकांत बांदेकर यांच्या खून करणाऱ्या व्यक्तींचा शोध घेणे पेडणे पोलिसांसमोर आव्हान आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: