क्रीडा-अर्थमतदेश-विदेश

रोनाल्डोची ‘ती’ कृती पडली ‘कोक’ला ४ बिलियन डॉलरला…

नवी दिल्ली :
​पत्रकार परिषदेदरम्यान पोर्तुगालचा कर्णधार ख्रिस्तियानो रोनाल्डोने कोको कोलाच्या बाटल्या बाजूला केल्यामुळे​​ ब्रॅंडला चांगलाच फटका बसला आहे. युरो कप 2022 स्पर्धेनिमित्त आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेदरम्यान रोनाल्डोच्या एका कृतीमुळे कंपनीला सुमारे चार बिलियन डॉलर्सचा अर्थात 29 हजार 352 कोटीचं नुकसान झाले आहे.

2020 युरो कप स्पर्धेत ‘ग्रुप ऑफ डेथ’ अशी ओळख असलेल्या एफ गटामध्ये हंगेरीविरुध्द होणाऱ्या सामन्याआधी रोनाल्डो पत्रकार परिषदेसाठी आला होता. यावेळी त्याने आपल्यासमोर कोका कोलाच्या दोन बाटल्या ठेवल्याचं  पाहिले. त्याने त्या बाटल्या बाजूला केल्या आणि तिथे असलेली पाण्याची बाटली हातामध्ये घेऊन पाणी असं म्हणत एका प्रकारे पाणी पिण्यासाठी लोकांना प्रोत्साहित केले.​कोका कोला कंपनीला रोनाल्डोची ही कृती महागात पडली असून 1.6 टक्क्यांनी शेअर्स खाली घसरले आणि सुमारे चार बिलियन डॉलर्सचा तोटा सहन करावा लागला आहे. कोका कोला कंपनीची किंमत 242 बिलियन डॉलर्सवरुन 238 वर आली आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: