महाराष्ट्रदेश-विदेश

‘देशाची बदनामी करण्याचा काँग्रेसचा डाव उघड’

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा घणाघात

मुंबई (अभयकुमार देशमुख) :
काँग्रेस पक्षाने कोरोनाच्या संदर्भात आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाची बदनामी करून मोदी सरकारला अडचणीत आणण्याची प्रचार योजना आखल्याचे उघडकीस आले आहे. संपूर्ण देश कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत संघर्ष करत असताना अशा प्रकारे देशाच्या विरोधात काम करणे निषेधार्ह आहे, अशी तीव्र प्रतिक्रिया भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी व्यक्त केली.

चंद्रकांत  पाटील म्हणाले की, सोशल मीडियाच्या जगात ज्याला टूलकिट म्हणतात असे काँग्रेस पक्षाचे एक सूचनापत्र उघडकीस आले आहे. त्यामध्ये मोदी सरकारला बदनाम करण्यासाठी काय काय करावे याच्या सूचना पक्षाच्या कार्यकर्त्यांना देण्यात आल्या आहेत. राजकीय विरोधासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाची बदनामी करण्यापर्यंत काँग्रेस गेली. तसेच कोरोनाच्या प्रसाराबाबतही हिंदू आणि मुस्लिम असा भेदभाव करून निवडक टीका करण्याचे डावपेच काँग्रेसने आखल्याचे उघड झाले आहे. हे धक्कादायक आणि निंदनीय आहे. या सर्व प्रकाराची केंद्रीय तपास यंत्रणांकडून चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी.

congress toolkit
चंद्रकांत पाटील

ते म्हणाले की, काँग्रेसच्या रिसर्च टीमने तयार केलेल्या या टुलकिटमध्ये शतकानुशतकांपासून हिंदू समाजाच्या श्रद्धेचं प्रतीक असणारा कुंभमेळा हा कोरोनाचा सुपर स्प्रेडर असल्याची चर्चा करण्याची सूचना पक्षाच्या कार्यकर्त्यांना देण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय माध्यमांनी सुपर स्प्रेडर कुंभ असा नॅरेटीव प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला असून तो आणखी वाढविण्यासाठी समविचारी आंतरराष्ट्रीय मीडिया व पत्रकारांशी हातमिळवणी करण्याची सूचना त्यामध्ये देण्यात आली आहे. ईदसाठी जमलेल्या गर्दीबाबत मात्र कोणतीही टिप्पणी करू नये, अशी सूचना काँग्रेस कार्यकर्त्यांना देण्यात आली आहे.

केवळ काँग्रेसचेच कार्यकर्ते कोरोना काळात जनतेला मदत करत आहेत असे भासवण्यासाठी हॉस्पिटल्समध्ये बेड आणि व्हेंटिलेटर सारखी इतर सामुग्री अडवून ठेवावी आणि केवळ काँग्रेस नेत्यांच्या सांगण्यावरूनच ती उपलब्ध करून दिली जावी, अशी आणखी एक अमानूष सूचना या टूलकिटमध्ये आहे, असल्याचा दावा पाटील यांनी केला.

ते म्हणाले की, एकूणच हे टूलकिट धक्कादायक असून त्याची निर्मिती व त्याचा वापर या संदर्भात केंद्रीय तपास यंत्रणांनी सखोल तपास करून कारवाई करण्याची आवश्यकता आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: