गोवा 

”त्या’ जनसुनावणी वेळी झाला लोकशाहीचा खून’

पेडणे (निवृत्ती शिरोडकर) :

गोवा किनारी विभाग व्यवस्थापन आराखड्याला अंतिम स्वरूप देण्यासाठी पणजी येथे जनसुनावणी गुरुवारी ८ जुलै रोजी झाली. त्यावेळी सरकारने लोकशाहीचा अक्षरशः खून करण्यात आला आहे; असा दावा मांद्रे गट कॉंग्रेस उपाध्यक्ष प्रमेश मयेकर यांनी केला आहे. सरकारने आता स्थानिक पंचायतीने जे आपले आराखडे सादर केले ते स्वीकारावे अशी मागणी प्रमेश मयेकर यांनी केली आहे.

सरकारची जनसुनावणी फक्त नागरिकांच्या डोळ्यात धूळफेक करणारी होती. नागरिकांच्या शंकांचे समाधान करण्यात आले नाही. नागरिकांना विश्वासात न घेता कोणीतरी बाहेरच्यांनी वातानुकुलीत कार्यालयात किंवा तारांकित हॉटेलात बसून डोळे झाकून आराखडा बनविला आहे. असा दावा प्रमेश मयेकर यांनी केला.

हा आराखडा स्थानिक लोकांना आणि ग्रामपंचायतींना विश्वासात घेऊन योग्य पद्धतीने तयार करणे गरजेचे आहे. स्थानिकांची घरे, झोपड्या यांचा उल्लेख नकाशा असणे बंधनकारक आहे.

या जनसुनावणी वेळी खाजन जमिनी, बांध, मानस, भरती रेषा, भरती रेषे पासून आखण्यात आलेल्या १०० मीटर व २०० मीटरची रेषा, मच्छीमारी क्षेत्र यावर विषय मांडता येतील असे म्हटले होते. परंतु प्रत्यक्षात जनसुनावणी आलेल्या वक्त्या नागरिकांना कोणत्याच प्रकारची योग्य उत्तरे देण्यात आली नाही. सर्त्काराने चालवलेली हि हुकुमशाही बंद करून स्थानिकाना न्याय द्यावा अशी मागणी मयेकर यांनी केली आहे.

अंतिम आराखड्याच्या वेळी गोमंतकीय यांनी अधिक जागृत व संघटित व्हायला पाहिजे. आता हि कामगिरी मांद्रे मतदारसंघातून कॉंग्रेस पक्ष करणार असल्याचे मयेकर यांनी सांगितले. मातृभूमीच्या रक्षणार्थ आता सर्वांनी संघटीत होवून काम करावे लागेल, त्यासाठी गावागावात जावून जागृती केली जाईल.

मांद्रे कॉंग्रेस नेते प्रमेश मयेकर यांनी बोलताना किनारी भागातील आमदारांनी या विषयी आवाज उठवून स्थानिक किनारी भागातील मच्छिमार इतर व्यवसायाला दिलासा मिळायला हवा त्यासाठी आमदारांनी स्थानिकासोबत रहावे अशी मागणी मयेकर यांनी केली.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: