गोवा 

राज्यातील संचारबंदी ३१ मे पर्यंत वाढवली

पणजी :
राज्यातील वाढते कोरोना रुग्ण लक्षात घेत राज्य सरकारने गोव्यातील संपूर्ण संचारबंदी अजून आठवडाभराने म्हणजे ३१ मे पर्यंत वाढवली असल्याची घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली.
दरम्यान, कोरोना नियंत्रणासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली विशेष टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली असून, यामध्ये डॉक्टरांसह 15 सदस्य असतील.टास्क फोर्सची आज दुपारी पहिली बैठक होईल. हा टास्क फोर्स तृतीय लाटेच्या आव्हानाला सामोरे जाण्यासाठी स्वतःला सुसज्ज करण्यासाठी राज्य सरकारने केलेल्या विविध कृतींबद्दल आढावा आणि काम करणार आहे.

राज्यातील कोविड प्रोटोकॉल व आरोग्यविषयक पायाभूत सुविधांचा आढावा घेण्यासाठी आणि पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा सुचविण्याकरिता गोमेकॉचे डीन डॉ. एस. एम. बांदेकर यांच्या अध्यक्षतेखाली डॉक्टरांची तज्ञ समिती गठित करण्याचा निर्णय सरकारने घेतला.​ या पॅनेलमध्ये बालरोग तज्ञ असतील. कारण अशी अपेक्षा आहे की तिसरी लहर मुलांना अधिक लक्ष करण्याची शक्यता आहे.

दरम्यान, गोमेकॉ येथील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये 60 खाटांचे बालरोग ‘आयसीयू ‘स्थापित केले जातील जे विशेषत: मुलांच्या उपचारांसाठी समर्पित आहेत​.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: