गोवा 

​राज्यात ७ जूनपर्यंत संचारबंदी कायम ​

पणजीः ​
राज्यात कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर सरकारने 9 मे पासून ​संचारबंदीची घोषणा केली होती. ही संचारबंदी वेळोवेळी वाढवून अखेर ३१ मे पर्यंत आणली होती. ​दरम्यान, पुन्हा एकदा ​या संचारबंदीत वाढ केल्याची घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली असून, आजच्या घोषणेनुसार ७ जून पर्यंत राज्यात संचारबंदी कायम राहणार आहे. 
शनिवारी मुख्यमंत्र्यांनी ​संचारबंदीचा कालावधी ​७​ जूनपर्यंत वाढवत असल्याची घोषणा केली आहे. मात्र याविषयीचा अधिकृत आदेश अजून ​प्रसिद्ध करण्यात आलेला नाही. लवकर​च  उत्तर गोवा जिल्हाधिकारी आणि दक्षिण गोवा जिल्हाधिकारी याविषयीचा अधिकृत आदेश जारी करणार असल्या​चे  मुख्यमंत्र्यांनी सांगित​ले आहे​.
Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: