क्रीडा-अर्थमत

डाबरचे ‘अनु तैलम नेजल ड्रॉप’ बाजारात

मुंबई :
डाबर कंपनीने आता ‘नेजल अनु तैलम ड्रॉप’ ची निर्मिती केली आहे. सदर नेजल ड्रॉप डोके दुखी व बंद नाकावर गुणकारी असून त्वरित आरामदायी ठरणार आहे.

अनु तैलमबाबत माहिती देताना डाबर कंपनीचे मार्केटींग हेड डॉ. दुर्गा प्रसाद यांनी सांगितले की, ‘’आयुर्वेद शास्त्रानुसार अनु तैलममध्ये गुणकारी घटक आहेत. या तेलातील औषधी घटक मानेपासून वरील इंद्रियांसाठी उत्तम आहेत. काहींना वारंवार सर्दी, डोके दु:खीचा त्रास संभवतो. या त्रासात अनु तैलमचे केवळ २ थेंब नाकात टाकल्यास त्वरित आराम मिळतो. हे औषध मस्तिष्काचे कार्य अधिक तीव्र करतो. तसेच, नाक -कान –डोळे- जीभ, या चार इंद्रियांना त्रास असल्यास त्यावर प्रभावीपणे मात करून सदर इंद्रियांच्या कार्यात सुधारणा होते’’.

खरं पाहता आयुर्वेद क्षेत्रात डाबरने स्वत:चा स्वतंत्र इतिहास घडवला आहे.१३७ वर्षांपासून डाबर कंपनी कार्यरत असून, आजवर अनेक आजारांवर उपयुक्त औषधांची निर्मिती केली आहे. हे सर्व औषधे जनतेचे पसंदीचे ठरले आहेत. हीच बाब लक्षात घेऊन डाबरने ‘अनु तैलम नेजल ड्रॉप’ चा प्रयोग केला आहे. सहज कुठेही बाळगता येईल अशा स्वरूपात केवळ १० मिली लिटीरचा ड्राप तयार केला असून, सर्व प्रमुख ई-कॉमर्स प्लेटफॉर्म आणि रिटेल शॉप्स मध्ये उपलब्ध आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: